होळीचा सण पण बाजारात 'रंग'च नाहीत...

09 Mar 2020 16:11:57

holi rangpanchami_1 
 
 
मुंबई : मुंबईमध्ये होळी हा सण आला की अनेक ठिकाणी आठवडाभर आधी विविध रंगांच्या थप्पीच्या थप्पी जागोजागी दिसतात. परंतु, यावर्दी कोरोनाच्या भयावह वादळामुळे होळीचा मात्र 'रंग'च बेरंग झाला आहे. सध्या रंगांच्या बाजारापेठेत शुकशुकाटच दिसत आहे. अनेक महत्त्वाच्या होळी सेलिब्रेशनचे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. देशभरात कोरोनाची भीती असल्याने त्याचा परिणाम रंगपंचमीवर झाला आहे. त्यामुळे रंगांची खरेदी ८० ते ९० टक्क्यांनी घटल्याचे विक्रेत्यांनी सांगितले आहे.
 
 
 
जगभरासह भारतामध्येही कोरोनाचे ४३ रुग्ण आढळले आहेत. यंदा रंगपंचमी न खेळण्याचा निर्णय काही आयोजकांनी घेतला आहे. ठाण्याच्या बाजारपेठेत ठिकठिकाणी रंग आणि पिचकाऱ्यांचे लहानमोठे स्टॉल्स लागले असले तरी, फक्त १० टक्केच खरेदी होत आहे. लोक चीनचे रंग आणि पिचकाऱ्यांकडेही दुर्लक्ष करीत आहेत. कोरोनाची भीती असल्याने ९० टक्के रंगांची बाजारपेठ थंडावले आहे. दरवर्षी पाच दिवसांअगोदर रंगांची खरेदी सुरु होते. परंतु, रंगपंचमी जवळ आली असूनही कोरोनामुळे रंगांची खरेदी झालेली नसल्याचे विक्रेत्यांनी सांगितले आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0