'ये तेरे बस की बात नही, तेरे...' गणेश नाईकांचे आव्हाडांना प्रत्युत्तर

09 Mar 2020 11:23:51

ganesh naik jitendra awha
 
 
मुंबई : महापालिका निवडणुकीच्या तोंडावर गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भाजपचे गणेश नाईक हे खंडणीखोर असून नवी मुंबईचे डॉन आहेत, असे गंभीर आरोप केले होते. या आरोपाला गणेश नाईक यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. 'ये तेरे बस की बात नहीं, तेरे बाप को बोल और नाम पुछे तो बोल गणेश नाईक.', असा टोला गणेश नाईक यांनी लगावला आहे. महापालिकेच्या तोंडावर त्यांच्यामधील हे शाब्दिक वॉर चांगलेच रंगले आहे.
 
 
 
“कोणी म्हणतो गणेश नाईक खंडणी बहाद्दर आहे, पण गणेश नाईकवर एक एनसीदेखील नाही. हिंमत असेल तर गणेश नाईक खंडणी बहाद्दर असल्याचे पुरावे घेऊन गुन्हा दाखल करा,” असे आव्हान गणेश नाईक यांनी आव्हाडांच्या भ्रष्टाचार आणि खंडणीच्या आरोपांवर उत्तर देताना दिले. गणेश नाईक यांनी यावेळी आपण मुलगा संदीप नाईकचा बळी दिला नसल्याचेही ते म्हणाले. “आपण संदीपला निवडणूक लढ म्हणून सांगितले होते, हे कार्यकर्त्यांना माहिती आहे,” असे यावेळी गणेश नाईक यांनी सांगितले.
 
 
 
Powered By Sangraha 9.0