दिल्ली हिंसाचार : दोन्ही हात कापून जीवंत जाळलं; आरोपी अटकेत

07 Mar 2020 13:21:45
Delhi Riots File Photo _1
 
 



नवी दिल्ली : दिल्ली हिंसाचारात मृत पावलेल्यांची संख्या आता ५३ वर पोहोचली आहे. तर जखमींचा आकडा हा त्याहून अधिक आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दिल्ली पोलीसांनी याच्या तपासासाठी एसआयटीची स्थापना केली आहे. आत्तापर्यंत एकूण ६८३ खटले दाखल केले आहेत. १९८३ जणांना ताब्यात घेतले आहे. एका व्यक्तीच्या हत्येप्रकरणी आरोपीला ताब्यात घेतले आहे. आरोपीचे नाव शाहनवाज उर्फ शानू (२७), असे आहे. पोलीस त्याची कसून चौकशी करत आहेत.
 
 
 
दिल्ली पोलीसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने उत्तर पूर्व विभागाने उत्तराखंड येथे राहणाऱ्या दिलबर सिंह नेगी याच्या हत्येप्रकरणी शाहनवाजला अटक केली आहे. दिलबर हा शिव विहार येथील अनील स्वीट हाऊस येथे काम करत होता. त्याचा मृतदेह दुकानात वाईट अवस्थेत जळालेला आढळला. दिल्ली पोलीसांच्या पथकाने दिलेल्या माहितीनुसार, '२४ फेब्रुवारी रोजी शिव विहार येथे दगडफेक सुरू झाली. अनेक दुकाने जाळण्यात आली. शाहनवाज हा आपल्या काही मित्रांसोबत मिठाईच्या दुकानात घुसला आणि आग लावली.'
 
 
अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, २६ फेब्रुवारी रोजी मिठाईच्या दुकानातून एक मृतदेह जळालेल्या अवस्थेतून बाहेर काढण्यात आला. जळालेल्या दुकानाच्या मालासोबत मृतदेहाचा हात कापलेल्या अवस्थेत आढळला. मृत्युपूर्वी त्याचा छळ करण्यात आल्याचे स्पष्ट दिसत होते. नराधमांनी त्याचे दोन्ही हात कापून टाकले होते. पोलीसांना मिळालेल्या साक्षी पुराव्यांनुसार, आरोपीने इतरांना हिंसाचार करण्यासाठी भडकवले होते.



Powered By Sangraha 9.0