हात जोडून नमस्कार करण्याची पद्धत विदेशींनीही अवलंबली!

07 Mar 2020 14:21:39
Narendra Modi _1 &nb


पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रतिपादन


नवी दिल्ली : कोरोना विषाणूमुळे जगभरातील दहशतीचे वातावरण असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जन औषधी दिनानिमित्त देशवासियांशी संवाद साधला. यावेळी कोरोनाशी लढण्यासाठी घेण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती त्यांनी उपस्थितांना दिली. कोरोनाच्या भीतीमुळे जगभरातील लोक आता भारतीयांप्रमाणे नमस्कार करू लागले आहेत, भारतीय संस्कृतील अभिवादन करण्याची ही परंपरा आज जगाने अवलंबली आहे, असे मोदी म्हणाले.
 
 
कोरोना व्हायरस हा हस्तांदोलन केल्यावरही पसरू शकतो, अशी भीती आज जगभरात आहे. यानिमित्त भारतीय संस्कृतीत केला जाणाऱ्या नमस्काराचा अवलंब जगभरातील लोकांनी स्वीकारला आहे. आपणही आता हस्तांदोलन न कराता समोरच्या व्यक्तीला नमस्कार करायला हवा, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी देशवासीयांना केले.
 
 
 
कोरोना विषाणूच्या दहशतीवर पंतप्रधानांनी भाष्य केले. "मी भारतीयांना आवाहन करू इच्छितो की, कुठल्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये, अफवा पसरवणाऱ्यांपासून सतर्क राहावे, स्वतः डॉक्टर न बनता डॉक्टरांचा सल्ला घ्या."
Powered By Sangraha 9.0