पुणे महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदी भाजपचा झेंडा

06 Mar 2020 14:16:49

pune election_1 &nbs
 
 
पुणे : शुक्रवारी पुणे महापालिकेच्या स्थायी अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये भाजपने महाविकास आघाडीला मात दिली. स्थायी समितीचे विद्यमान अध्यक्ष हेमंत रासने यांनी महाविकास आघाडीचे महेंद्र पाठारे यांचा पराभव केला. रासने यांनी पठारे यांचा सहा विरुद्ध दहा असा पराभव केला. तसेच, सलग दुसऱ्यांदा अध्यक्षपदावर निवडून येणंच मान मिळवला. स्थायी समिती अध्यक्षपदाची मुदत संपल्याने यावर्षीच्या (२०२०-२१) अध्यक्षपदासाठी निवडणूक घेण्यात आली.
 
 
 
सोळा सदस्यीय स्थायी समितीमध्ये भाजपाचे १०, राष्ट्रवादीचे ४ तर शिवसेना आणि काँग्रेसचा प्रत्येकी एक सदस्य आहे. भाजपाकडे स्पष्ट बहूमत असल्याने त्यांचा विजय निश्चित होता. अर्ज मागे घेण्याकरिता १५ मिनिटांचा अवधी देण्यात आला होता. आधी पठारे यांच्याकरिता मतदान घेण्यात आले. त्यांच्याबाजूने महाविकास आघाडीची ६ मते पडली. तर रासने यांच्या बाजूने १० मते पडली. बहुमत रासने यांच्या बाजूने असल्याने त्यांना निवडणूक निर्णय अधिकारी पीएमपीएमएलच्या व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे यांनी विजयी घोषित केले.
 
 
 
Powered By Sangraha 9.0