अबब ! 'दादा'ने नाकारली सर जडेजाला खेळण्याची परवानगी

06 Mar 2020 14:41:21

ravindra jadeja_1 &n
 
 
मुंबई : बीसीसीआयच्या अध्यक्षपदी सावरावे गांगुली विराजमान झाल्यापासून भारतीय क्रिकेटमध्ये अनेक सकारात्मक बदल दिसले आहेत. तसेच अनेक कठोर निर्णय घेऊन दादाने भारतीय क्रिकेटला सुस्थीमध्ये आणण्याचा प्रयत्न करत आहे. नुकतेच दादाने भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळा़डू रवींद्र जडेजा रणजी स्पर्धेच्या अंतिम सामन्यामध्ये खेळण्यास परवानगी नाकारली. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या (एससीए) मागणीला नकार दिला आहे. त्यामुळे ९ मार्चला सुरू होणाऱ्या पश्चिम बंगालविरुद्धच्या अंतिम सामन्यात जडेजाला खेळता येणार नाही.
 
 
"रणजीपेक्षा आधी देश महत्त्वाचा आहे", असे गांगुलीने एससीएला कळवले आहे. १२ मार्चपासून भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळणार आहे. त्यामुळे जडेजाला सौराष्ट्रकडून खेळण्याची मान्यता मिळू शकली नाही. पश्चिम बंगालने १३ वर्षांनंतर रणजी करंडक अंतिम फेरी गाठली आहे. त्याचबरोबर सौराष्ट्रने सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.
 
 
"मी बीसीसीआयच्या अध्यक्षांना जडेजाला रणजीचा अंतिम सामन्यात खेळण्यास परवानगी देण्यास सांगितले, परंतु त्यांनी नकार दिला.", अशी माहिती एससीएचे अध्यक्ष जयदेव शहा यांनी दिली. आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत जडेजा हा भारतीय संघाचा भाग आहे, ज्यामुळे त्याला सोडण्यात आलेले नाही. राजकोट येथील त्यांच्या घरच्या मैदानावर सौराष्ट्र बंगालविरुद्ध विजेतेपदाचा सामना खेळणार आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0