देशात कोरोनाचे २९ रुग्ण : केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची माहिती

05 Mar 2020 14:01:02
Corona _1  H x



नवी दिल्ली
: देशात कोरोना विषाणूची लागण झालेले २९ रुग्ण आढळले आहेत. यापैकी तिघेजण (केरळमधले) बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्ष वर्धन गुरुवारी संसदेच्या दोन्ही सभागृहात निवदेन देत आहेत.
 
 
४ मार्च २०२०पासून देशातल्या बहुतांश विमानतळांवर सार्वत्रिक तपासणी अनिवार्य करण्यात आली आहे. यासाठी आज राज्यांमधून अतिरिक्त कर्मचारी पाठवण्यात येणार आहेत. अन्य देशातून येणाऱ्या प्रवाशांबरोबरच देशातही संसर्गाद्वारे कोरोनाची लागण होत असल्याचे आढळून आले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा आणि पंचायत समिती स्तरावर जलद प्रतिसाद दलाची स्थापना करण्यासाठी जिल्हाधिकारी आणि राज्यांना यात सहभागी करुन घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
 
 
या रोगाच्या व्यवस्थापनासाठी खासगी क्षेत्रालाही सहभागी करुन घेतले जाणार आहे. यासंदर्भात आरोग्यमंत्री गुरुवारी सायंकाळी बैठक घेणार आहेत. एकूण ३५४२ नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. यापैकी २९ नमुने कोरोनाबाधित असल्याचे आढळले आहे. ९२ नमुन्यांची तपासणी सुरू असून २३ नमुन्यांची फेरतपासणी केली जात आहे.










Powered By Sangraha 9.0