अभिमानास्पद ! एकही चेंडू न खेळता भारताने गाठली अंतिम फेरी

05 Mar 2020 11:07:34

Team India women_1 &
 
 
नवी दिल्ली : महिला विशेष सप्ताह चालू असतात भारतीय महिलांसाठी एक आनंदाची बातमी. ती म्हणजे भारतीय महिला क्रिकेट संघाने आयसीसीच्या टी-२० विश्वचषक स्पर्धेमध्ये अंतिम फेरीमध्ये प्रवेश मिळवला आहे. गुरुवारी भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये सिडनी येथे होणार उपांत्य फेरीचा सामना खेळवण्यात येणार होता. परंतु, पावसामुळे हा सामना रद्द करण्यात आला आणि याचा फायदा भारतीय संघाला मिळाला. महिला क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच भारतीय महिलांनी टी २० स्पर्धेमध्ये अंतिम फेरी गाठली.
 
 
 
 
 
टी २० विश्वचषक स्पर्धेत भारत आणि इंग्लंड यांच्यात होणारा उपांत्य फेरीचा सामना पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द करण्यात आला. पावसामुळे एकही चेंडूचा सामना होऊ शकला नाही. त्यामुळे गुणांच्या तुलनेनुसार भारतीय संघाला अंतिम फेरीत स्थान मिळाले. साखळी फेरीत भारताने ४ सामने जिंकत ८ गुण मिळवले होते. तर इंग्लंडने ३ सामने जिंकून ६ गुण मिळवले होते. त्यामुळे स्पर्धेच्या नियमांच्या आधारावर भारतीय संघाला अंतिम फेरीत स्थान देण्यात आले. महिला टी २० विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात भारताने प्रथमच अंतिम फेरीत धडक मारली आहे.
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0