दिल्लीतील प्राथमिक शाळा ३१ मार्चपर्यंत बंद ; कोरोनामुळे खबरदारी

05 Mar 2020 16:57:21

corona_1  H x W




नवी दिल्ली 
: देशात कोरोना विषाणूच्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ३० वर पोहोचली आहे. गुरुवारी उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमध्ये एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळला. अधिकृत सूत्रांच्या माहितीनुसार, हा रुग्ण मध्यमवयीन असून नुकताच इराणला गेला. मागील आकडेवारीत केरळमध्ये तीन घटना समोर आल्या होत्या. परंतु हे रुग्ण बरे होऊन पुन्हा घरी परतले आहे. भारतात पॉझिटिव्ह आढळलेले ३० पैकी १६ जण इटलीचे पर्यटक आहेत.

दिल्लीतील सर्व प्राथमिक शाळा ३१ मार्चपर्यंत बंद राहतील


दरम्यान, दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी जाहीर केले की दिल्लीतील सर्व प्राथमिक शाळा (सरकारी व खासगी) ३१ मार्चपर्यंत बंद राहतील. यासह दिल्ली सरकारने आपल्या कार्यालयांमध्ये बायोमेट्रिक उपस्थिती तात्पुरती बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याचा धोका लक्षात घेता सरकारने असे करण्याचा निर्णय घेतला आहे.



आतापर्यंत किती रुग्ण पॉझिटिव्ह


गाझियाबादमध्ये एक नवीन प्रकरण समोर आले आहे. दिल्लीत अद्याप कोरोना विषाणूचे एक पॉझिटिव्ह प्रकरण समोर आले आहे. मात्र, इटलीतील १६ नागरिकांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. याशिवाय आग्रामध्ये सहा, गुरुग्राममधील एक, केरळमधील तीन, जयपूरमधील एक आणि तेलंगणात एक रुग्ण आढळला.
Powered By Sangraha 9.0