हस्तांदोलन सोडा; भारतीय संस्कृतीनुसार 'नमस्ते' म्हणा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Mar-2020
Total Views |
Benjamin-Netanyahu_1 



इस्त्रायलचे पंतप्रधान नेत्यानाहूंचे आवाहन


नवी दिल्ली : भारतासह जगभरातील देशांमध्ये कोरोना विषाणूची दहशत आहे. कोरोनामुळे मृतांचा आकडा हा हजारावर पोहोचला असून या विषाणूची बाधा झालेल्या रुग्णांची आकडेवारी त्याहून अधिक आहे. अशातच इस्त्रायलच्या पंतप्रधानांनी कोरोना व्हायरसच्या बचावासाठी एक आवाहन केले आहे. हस्तांदोलन करू नका भारतीय संस्कृतीत ज्या प्रमाणे नमस्ते केले जाते, तसे अभिवादन एखाद्या व्यक्तीला भेटल्यावर करा, त्यामुळे या रोगाचा संसर्ग होण्याची शक्यता कमी होते. बेंजामिन यांच्या या वक्तव्याची माहिती भारतातील इस्त्रायली राजदूतांनी ट्विटरद्वारे केली आहे.
 

 



इस्त्रायलमध्ये एकूण २० जणांना कोरोना विषाणूची बाधा झाली आहे. एकूण सात हजार जणांचा संपर्क कोरोना बाधितांशी आला त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी चाचणीसाठी पाठवण्यात आले आहे. तसेच देखरेखीखाली ठेवले आहे. या विषाणूपासून रोखण्यासाठी काळजी घेण्याचे आवाहन पंतप्रधान नेत्यान्याहू यांनी केले आहे. हस्तांदोलन न करता भारतीय संस्कृतीप्रमाणे नमस्ते करावा, असे आवाहन त्यांनी जनतेला केले आहे. भारतीय संस्कृतीत हस्तांदोलन करण्याची परंपरा नाही.
 
 
समोरील व्यक्तीला वाकून नमस्कार करणे तसेच चेहऱ्यावर स्मित हास्य ठेवणे, असे स्वागत पारंपारीकरीत्या केले जाते. भारतीयांची ही दूरदृष्टी आता पाश्चिमात्य देशांनाही समजू लागली आहे, अशी प्रतिक्रीया नेत्यान्याहू यांच्या या वक्तव्यानंतर अनेकांनी दिली आहे.







@@AUTHORINFO_V1@@