अंतिम सामन्यामध्ये भारत भिडणार ऑस्ट्रेलियाशी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Mar-2020
Total Views |

indw ausw_1  H
नवी दिल्ली : आयसीसी महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेचे अंतिम शिलेदार निश्चित झाले आहेत. ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत अंतिम सामन्यामध्ये प्रवेश केला आहे. आता येत्या रविवारी ८ तारखेला भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया असा सामना पाहायला मिळणार आहे. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेल्या दुसऱ्या उपांत्यमध्ये पावसामुळे सामना कमी षटकांचा करण्यात आला. ऑस्ट्रेलियाने हा सामना ५ धावांनी जिंकला.
 
 
भारत आणि इंग्लंड यांच्यामधील पहिला उपांत्य सामना रद्द करण्यात आला होता. साखळी फेरीत भारताने ४ सामने जिंकत ८ गुण मिळवले होते. तर इंग्लंडने ३ सामने जिंकून ६ गुण मिळवले होते. त्यामुळे स्पर्धेच्या नियमांच्या आधारावर भारतीय संघाला अंतिम फेरीत स्थान देण्यात आले. साखळी फेरीत भारताचा सामना ऑस्ट्रेलियाच्या संघाशी झाला होता. यावेळेस भारतीय संघाने ऑस्ट्रेलियावर १७ धावांनी विजय मिळवला होता.
 
 
भारताच्या तुलनेत ऑस्ट्रेलियाचा संघ हा ताकदवान मानला जातो. पण, साखळी सामन्यामध्ये केलेल्या पराभवानंतर भारतीय संघाचा आत्मविश्वास नक्की उंचावलेला आहे. त्यामुळे भारत पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियाला नमवून महिला टी २० विश्वचषक जिंकतो का? आणि स्पर्धा खिशात घालत भारतीय महिला संघ इतिहास रचून महिला दिनानिमित्त भारतीय महिलांना विजयाची भेट देणार का? हा औत्सुक्याचा विषय ठरणार आहे.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@