६ हजार कोटींचा मालक... तरीही मागतोय हुंडा?

05 Mar 2020 14:53:14

sachin bansal_1 &nbs
 
 
नवी दिल्ली : ६ हजार कोटींचे मालक असलेले फ्लिपकार्टचे सहसंस्थापक सचिन बंसल यांच्यावर हुंड्यासाठी छळ आरोपाने एकच खळबळ माजली आहे. त्यांची पत्नी प्रिया हिने बंगळुरूच्या कोरामंगळा पोलीस स्थानकात हुंड्याचा छळ केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. सचिन बंसल यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील आणखी ३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
 
सचिन बंसल, त्याचे वडील सतप्रकाश अग्रवाल, आई किरण बंसल आणि भाऊ नितीन बंसल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सचिन बंसल हे फ्लिपकार्टचे सहसंस्थापक असून सध्या ते ६ हजार कोटींचे मालक आहेत. सचिन बंसल सध्याच्या घडीला ६ हजार कोटींचे मालक आहे. नुकतेच त्यांनी फ्लिपकार्टमधील आपले काही शेअर काढले होते.
 
 
सचिन आणि प्रिया बंसल यांनी २०००मध्ये लग्न केले होते. तक्रारीमध्ये प्रियाने आरोप केला आहे की तिच्या लग्नानंतर सचिन आणि त्याच्या कुटुंबीयांनी हुंडा मागण्यास सुरवात केली. २८ फेब्रुवारी रोजी प्रियाने केलेल्या तक्रारीमध्ये त्यांनी सांगितले की, 'वडिलांनी लग्नासाठी ५० लाख रुपये खर्च केले आहेत आणि सचिनला ११ लाख रुपये रोख दिले आहेत. दरम्यान, न्यायालयाच्या नोंदीनुसार सचिन बंसलची आई किरण बन्सल यांनी काही आठवड्यांपूर्वी आपल्या सुनेच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता.
 
 
Powered By Sangraha 9.0