दिल्ली हिंसाचार : ताहीर हुसेन पोलिसांच्या ताब्यात

05 Mar 2020 14:53:14

tahir hussain_1 &nbs




नवी दिल्ली :
दिल्ली दंगलीच्या वेळी आयबी कर्मचारी अंकित शर्माचा खून करून हिंसाचार भडकावल्याचा आम आदमी पक्षाचा नगरसेवक आरोपी ताहिर हुसेन याने आत्मसमर्पण केले आहे. पक्षामधून हकालपट्टी करण्यात आलेल्या ताहिर हुसेन याने दिल्लीच्या राउज एवेन्यू कोर्टात आत्मसमर्पण केले आहे.


दिल्ली हिंसाचारात मारल्या गेलेल्या आयबी अधिकारी अंकित शर्माच्या खुनाचा ताहीर हुसेनवर आरोप ठेवण्यात आला आहे. तसेच त्याच्या घरात मिळालेल्या पुराव्यांवरून दिल्लीत हिंसाचार घडविल्याचा आरोपही त्याच्यावर आहे. या आरोपानंतर ताहीर याच्याविरोधात एफआयआर नोंदविण्यात आला. अंकित शर्माला ताहिर हुसेनच्या घरात नेऊन ठार मारल्याचा आरोप आहे. अंकित शर्माच्या पोस्ट मॉर्टम अहवालात त्याच्या शरीरावर धारदार शस्त्राने चारशे वेळा हल्ला झाल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी ताहिर हुसेनविरोधात कलम ३०२ (खून), ३६५(अपहरण), २०१ (पुरावा मिटवणे) आणि ३४ (सामान्य हेतू) अंतर्गत एफआयआर नोंदविला गेला आहे. २७ फेब्रुवारी रोजी ताहिरविरुद्ध एफआयआर नोंदविण्यात आला होता, तेव्हापासून तो फरार होता.


हिंसाचाराच्या आरोपावर, ताहिर हुसेन यांनी स्पष्टीकरण दिले होते की, त्याला खोट्या आरोपाखाली अडकविण्यात येत आहे आणि त्याचा जीव धोक्यात आहे. तसेच पोलिसांनी निष्पक्ष चौकशी करावी, असेही ते म्हणाले. ताहिर यांनी पोलिस तपासास सहकार्य करण्याचे सांगितले होते पण एफआयआर नोंदल्यापासून तो फरार होता. ताहिर हुसेन यांनी दावा केला आहे की, जेव्हा हिंसाचार होत होता तेव्हा त्याने पोलिसांना अनेकदा फोन केला होता. एवढेच नव्हे तर पोलिसांच्या उपस्थितीत गर्दीतून आपल्याला बाहेर काढण्यात आले असा दावाही त्याने केला.परंतु पोलिसांनी मात्र त्याचा हा दावा फेटाळून लावला आहे.
Powered By Sangraha 9.0