मुलगा झाला नाही म्हणूनच छळ... विद्या चव्हाणांच्या सुनेने दिले उत्तर

    04-Mar-2020
Total Views | 464

vidya chavan_1  
 
 
मुंबई : महिलांसाठी लढत असलेल्या राष्ट्रवादीच्या आमदार विद्या चव्हाण यांच्यावर कौटुंबिक छळाचा आरोप लावून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर त्यांनी सुनेचे विवाहबाह्य संबंध असल्याचे प्रसार माध्यमांना सांगितले. परंतु, हे सर्व आरोप खोटे असून विद्या चव्हाण आणि त्यांच्या कुटुंबीयांनी मुलगा होत नाही म्हणून माझा छळ करत होते असे सांगितले आहे. त्यामुळे आता विद्या चव्हाण यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
 
 
“आपले विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप हा खोटा आहे. जेव्हा मी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली त्यावेळी कुटुंबीयांनी माझ्याविरोधात पुरावे गोळा करून बदनाम करण्याची धमकी दिली होती. त्यांना आता तेच केलं आणि माझ्याविरोधात कट रचला. मुलगा हवा म्हणून कुटुंबीयांनी आपला छळ केला. मला पहिली मुलगी होती, त्यानंतर दुसरीही मुलगी झाली. त्यामुळे कुटुंबीयांकडून अधिक छळ करण्यात आला.” असा दावा राष्ट्रवादी आमदार विद्या चव्हाण यांच्या सुनेने केला आहे.
 
 
दीराने माझा विनयभंग केल्याची तक्रार मी १६ जानेवारीला केली होती. त्यानंतर २२ जानेवारीला मी कौटुंबिक हिंसाचाराची केस केली. त्यानंतर स्वतःची कातडी वाचवण्यासाठी आणि आपल्या मुलाचा बचाव करण्यासाठी विद्या चव्हाण खोटेनाटे आरोप करुन माझी बदनामी करत आहेत, असा दावा विद्या चव्हाणांच्या सूनेने केला आहे.
 
 
विद्या चव्हाण यांनी सुनेचे विवाहबाह्य संबंध असल्याचे केले होते आरोप
 
 
“सुनेच्या मोबाईलमधील चॅट आणि अन्य काही बाबींवरून तिचे विवाहबाह्य संबंध असल्याचं आमच्या निदर्शनास आलं. माझ्या मुलानं यासंदर्भातील सर्व पुरावे गोळा केले आणि त्यानंतर या संपूर्ण प्रकाराची आम्हाला कल्पना दिली. त्यांनी घटस्फोटासाठी वकीलांशी संपर्कदेखील साधला होता,” असे त्यांनी बचावामध्ये सांगितले होते.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121