इटलीहून भारतात आलेल्या १५ पर्यटकांना कोरोनाची लागण

04 Mar 2020 12:31:54

corona virus_1  



नवी दिल्ली : इटलीहून आलेल्या १५ पर्यटकांना कोरोना व्हायरसची लागण झाली असल्याची माहिती समोर आहे. डीडी न्यूजने दिलेल्या सुत्रांच्या माहितीनुसार, इटलीहून दिल्लीला आलेले १५ जण करोनाबाधित असल्याचे आढळून आले आहे. इटलीहून भारतात आल्यानंतर त्यांना वेगळे ठेवण्यात आले होते. दिल्लीत आल्यानंतर एम्समध्ये २१ नमुन्यांची तपासणी केली असता १५ सर्व जणांना करोना व्हायरसची लागण झाली असल्याचे लक्षात आले. या सर्वांना आयटीबीपी छावणीमध्ये डॉक्टरांच्या निरीक्षणात ठेवण्यात आले आहे.दिल्ली, हैदराबाद आणि जयपूरमध्ये प्रत्येक एक व्यक्ती करोना संक्रमित असल्याचे आढळले आहे.


नोएडातल्या तीन मुलांसह सहा जणांचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. मात्र त्यांना कोरोनाची लागण झाली नसल्याचे सिद्ध झाले आहे. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना १४ दिवस आपल्या कुटुंबापासून वेगळे ठेवण्यात आले आहे. त्यांच्यात पुन्हा कोरोनची लक्षणे आढळल्यास त्यांची पुन्हा चाचणी करण्यात येईल. कालपर्यंत देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ६ होती आता या १५ पर्यटकांचे नमुने पॉझिटिव्ह आल्याने आता ती संख्या २१ झाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने तीन मार्च व त्याआधी जरी केलेले व्हिसा परवानगी रद्द करण्याचे देश दिले आहे. संयुक्त राष्ट्राचे सदस्य, राजदूत व ओसीआय कार्डधारक यांनाच भारतात येण्याची परवानगी दिली जाईल. मात्र त्यांनाही वैद्यकीय चाचण्यांशिवाय प्रवेश मिळणार नाही. 
Powered By Sangraha 9.0