दादाचे निकटवर्तीय सुनील जोशी बीसीसीआय निवड समितीच्या अध्यक्षपदी

04 Mar 2020 18:08:01

sunil joshi_1  
 
 
मुंबई : भारतीय क्रिकेट संघाला दोन नवीन निवड समितीचे प्रमुख मिळाले आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) बुधवारी २ नवीन निवड समिती अध्यक्ष्यांची घोषणा केली. बीसीसीआयने ज्येष्ठ निवड समितीसाठी सुनील जोशी आणि हरविंदरसिंग यांची नावे निश्चित केले आहे. आता हे दोघेही दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाची निवड करणार आहेत.
 
 
माजी भारतीय क्रिकेटपटू मदन लाल, आरपी सिंह आणि महिला खेळाडू सुलक्षणा नाईक यांच्यासह क्रिकेट सल्लागार समितीची बुधवारी मुंबईतील बीसीसीआय मुख्यालयात बैठक झाली. या बैठकीत All-India Senior Selection Committee (Men) यांच्या दोन सदस्यांची निवड करण्यात आली, त्यात सुनील जोशी आणि हरविंदर सिंग यांचा समावेश आहे. क्रिकेट सल्लागार समितीने सुनील जोशी यांची भारतीय संघाच्या निवड समितीचे अध्यक्ष म्हणून करण्याची शिफारस केली होती.
 
 
सीएसी या उमेदवारांच्या कामाचा एक वर्षासाठी आढावा घेण्यात येणार आहेत. त्यानंतर बीसीसीआयकडे अहवाल सादर केला जाईल. सुनील जोशी यांनी भारताला अनेक सामने एकहाती जिंकून दिले होते. २००१मध्ये बांगलादेशविरुद्ध झालेल्या कसोटी सामन्यात सुनील जोशी यांनी ९२ धावांची खेळी केली होती. एवढेच नाही तर त्यांनी 8 विकेटही घेतल्या होत्या. जोशी यांच्या या खेळीच्या जोरावर भारतानं हा सामना जिंकला होता.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0