कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विक्रोळी, मुंबईतील सेवाकार्य

31 Mar 2020 22:11:56
1_1  H x W: 0 x




मुंबई : दि. 31 मार्च रोजी 20 गरीब कुटुंबांना (ज्यांचे हातावर पोट आहे / पेंटर, बिगारी, भांडीकुंडी घरकाम करणार्‍या महिला) राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, सोमेश्वर शाखेतर्फे इंदिरा नगर, घाटकोपर (प) येथे धान्य स्वरुपात मदत करण्यात आली.

 
 

2_1  H x W: 0 x 
 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मजूर आणि निराधार वृद्धांवर उपासमारीची वेळ आली आहे. प्रीतेश पटेल, शंकर नायडू, रोहन नायडू, पवनकुमार प्रजापती, राम गुईन, नितीन शिंदे, मकसूद शेख या मित्रांनी एकत्र येऊन रामभजन कंपाऊंड, विक्रोळी येथे मजदूर, नाका कामगार, निराधार लोकांसाठी दररोज एक वेळचा नाश्ता आणि दोन वेळचे जेवण उपलब्ध करून दिले आहे. या मित्रांच्या अन्नछत्रासाठी परिसरातील अनेक जण स्वेच्छेने मदतही करत आहेत.

 

3_1  H x W: 0 x 
 
 

विक्रोळी गणेश मार्ग येथील ओल्ड बजरंगदल मंडळाने परिसरातील गरजूंसाठी दररोज अन्नवाटप सुरू केले आहे.

 

 

4_1  H x W: 0 x 
 
 
विक्रोळी परिसरातील टागोर नगर ग्रुप क्र. 2 येथील सोशिअल वेलफेअर कमिटीतर्फे परिसरातील गरजूंसाठी दररोज अन्नवाटप करण्यात येत आहे.
Powered By Sangraha 9.0