रामायण-महाभारतानंतर ‘शक्तिमान’ही प्रेक्षकांच्या भेटीला!

    दिनांक  31-Mar-2020 11:24:16
|

shaktiman_1  H


पुन्हा ऐकू येणार ‘शक्तिमान...शक्तिमान...शक्तिमान...'

मुंबई : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी म्हणून लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनची हाक दिल्यापासून नागरिकांनी त्याला प्रतिसाद देत आणि कोरोनावर मात करणे साठी म्हणून घरातच राहण्याला प्राधान्य दिले. पण, काही दिवसातच उरलेल्या जवळपास १५-२० दिवसांत करायचे तरी काय असा प्रश्नही अनेकांना पडला.


काहींनी यामध्ये बैठ्या खेाळंचा आधार घेतला. तर काहींनी मनोरंजनासाठी वेब सीरिजच्या विश्वात प्रवेश केला. हा साठा संपत नाही तोच डीडीने नव्वदच्या दशकातील अतिशय गाजलेल्या मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आणणाचा निर्णय घेतला. ज्याअंतर्गत 'महाभारत', 'रामायण', 'ब्योमकेश बक्शी', 'सर्कस' असे कार्यक्रम पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आणण्याचा निर्णय घेण्यात आला. यामध्येच सोशल मीडियावर अनेकांनीच आणखी काही मालिका पुन्हा सुरु करण्यात याव्यात असा सूर लगावला. ज्यामध्ये अग्रस्थानी नाव होतं ते म्हणजे 'शक्तिमान' या मालिकेचे.


मुकेश खन्ना यांची मुख्य भूमिका असणाऱ्या या मालिकेत त्यांनी साकालेला गंगाधर आणि त्यांनीच साकारलेला शक्तिमान प्रेक्षकांच्या आजही लक्षात आहे. असा हा शक्तिमान पुन्हा एकदा वाईटाचा अंत करण्यासाठी छोट्या पडद्याच्या माध्यमातून तुमच्या भेटीला येणार आहे.


१ एप्रिलपासून दररोज दुपारी १ वाजता दूरदर्शनच्या डीडी नॅशनल या वाहिनीवर प्रसारित केला जाणार आहे. त्यापाठोपाठ दूरदर्शनवर गाजलेल्या श्रीमान श्रीमती, व्योमकेश बक्षी,सर्कस यासारख्या मालिकादेखील पुन्हा रसिकांच्या भेटीला येणार आहेत.


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.