पुणे विद्यापिठाच्या सर्व परीक्षा स्थगित

    दिनांक  31-Mar-2020 14:43:42
|

Pune University _1 &नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने येत्या १४ एप्रिलपर्यंतच्या सर्व परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. १४ एप्रिलनंतर करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेऊन परीक्षेसंदर्भातील माहिती सर्व संलग्न महाविद्यालयांना कळविण्यात येणार असल्याचे विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळ विभागातर्फे सांगण्यात आले आहे.

 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या पुणे, अहमदनगर नाशिक या तीनही जिल्ह्यांमधील संलग्न महाविद्यालयांच्या व इतर शैक्षणिक संस्थांच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत . राज्य शासनाने येत्या ३१ मार्चपर्यंत शाळा - महाविद्यालयांना सुट्टी देण्याचा निर्णय घेतला होता. त्यात कोरोनाचा वाढता फैलाव रोखण्यासाठी येत्या १४ एप्रिलपर्यंत लॉकडाउन, संचारबंदी व जमावबंदीचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.

 

मात्र, विद्यापीठाने परीक्षांबाबत कोणताही निर्णय जाहीर केला नव्हता. त्यामुळे विद्यापीठाने सर्व परीक्षा पुढे ढकलण्याबाबतचे परिपत्रक प्रसिद्ध केले आहे . येत्या १४ एप्रिलनंतर कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेऊन परीक्षेसंदर्भातील माहिती सर्व संलग्न महाविद्यालयांना कळविली जाईल , असे विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक महेश काकडे यांनी सांगितले .

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.