बाहेर फिरणाऱ्यांची 'बाईक' होणार जप्त

    दिनांक  31-Mar-2020 14:07:59
|
Nashik Bikers _1 &nb
 
 
 

नाशिक : देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आलेला आहे. तरीही नाशिक शहरात संचारबंदी व जमावबंदीचे उल्लंघन करून वाहनांवरून भटकंती करत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे . त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी पोलीस आयुक्त विश्वास नांगरे- पाटील यांनी विनाकारण शहरात भटकंती करताना वाहनचालक दिसताच त्याचे वाहन तीन महिने जप्त करून पोलीस ठाण्याच्या आवारात ठेवण्याचे आदेश दिले आहेत. 
 
 
 
आतापर्यंत १५० गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत . करोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी घराबाहेर जाणे टाळा , सोशल डिस्टन्स ठेवा, अत्यावश्यक कारणासाठी घराबाहेर जायचे असेल तर पोलिसांशी संपर्क साधा,  असे आवाहन पोलिस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी केले आहे . तरीही काहीजण दुचाकी व कारने मित्रांसह रस्त्यांवर येत हुल्लडबाजी करत असून मोबाईलमध्ये फोटो व शूटिंग करून सोशल मीडियावर व्हायरल करत आहेत. ही बाब पोलीस आयुक्तांच्या निदर्शनास येताच विनाकारण
भटकंती करणाऱ्या वाहनचालकांची वाहने जप्त करून त्यांची वाहने तीन महिने पोलीस ठाण्याच्या आवारात ठेवा , असे आदेश त्यांनी पोलिसांना दिले आहेत. त्यामुळे रस्त्यांवरून विनाकारण भटकंती करणे वाहनचालकांना महागात पडणार आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.