राज्याच्या चिंतेत भर ! राज्यात एका दिवसात ७२ नावे रुग्ण

31 Mar 2020 21:43:43

Maharashtra_1  

राज्यातील एकूण रुग्ण संख्या ३०२

 
 
 
मुंबई : राज्यामध्ये मंगळवारी तब्बल ७२ नावे रुग्ण सापडले आहेत. यामध्ये फक्त मुंबईतूनच ५९ रुग्ण आहेत. त्यामुळे राज्यातील एकूण करोना बाधित रुग्णांची संख्या ३०२ झाली आहे. मुंबईत ५९ तर १३ रुग्ण मुंबई परिसरातील शहरी भागातील आहेत. तसेच, ५ रुग्ण पुण्याचे, ३ अहमदनगरचे आणि २ बुलढाणा येथील आहेत. आतापर्यंत ३९ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
 
 
वरळी कोळीवाड्यात आणखी चार कोरोनाबाधित ; रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण
 
 
वरळी कोळीवाड्यात सोमवारी ६ रुग्ण कोरोना पाॅझीटीव्ह सापडल्यानंतर गेल्या २४ तासांत आणखी चार रुग्ण कोरोना पाॅझीटीव्ह आढळले. कोरोना रुग्णांच्या वाढत्यासंख्येमुळे कोळीवाडा परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान,सोमवारी सकाळपासून कोेळीवाडा परिसर पोलिसांनी सील केल्याने परिसरातील रहिवाशांना जीवनावश्यक वस्तुंंसाठी बाहेर जाता आले नाही.
 
 
कोळीवाड्यात सोमवारी ६ रुग्ण कोरोना पाॅझीटीव्ह तर १७ रुग्ण कोरोना संशयीत आढळले होते. तर सोमवारपासून आतापर्यंत आणखी ४ रुग्ण करोना पाॅझीटीव्ह रुग्ण आढळल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यानंतर वरळी पोलिसांनी वरळी कोळीवाडा, सुंदर नगर, जनता काॅलनी परिसर सील केला आहे. परिसर सील केल्यामुळे आता रहिवाशांना भाजीपाला, दूध यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. सोमवार सकाळपासूनच कोळीवाडा परिसरातील रहिवाशांना घराबाहेर पडण्यास बंदी घातली आहे. त्यात घरातील एकाच व्यक्तीला घराबाहेर सोडले जात असून बॅरीकेट्स केलेल्या हद्दीच्या आतूनच पोलीस सामान आणून देत आहेत. मात्र यामुळे लोकांची फार मोठी गैरसोय होत असल्याचे स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे.
 
 
दरम्यान, कोळावाडा परिसरात सोमवारनंतर आजही काही कोरोना पाॅझीटीव्ह रुग्ण आढळले आहेत. कोरोना रुग्ण सापडल्यापासून परिसर सील केला आहे. यामुळे परिसरातील लहान मुले, आजारी माणसे यांचे हाल होत आहे. कोरोना पाॅझीटीव्ह रुग्ण आढळल्याने परिसर सील केला असून कोळीवाडा परिसरातील रहिवासी पोलीस व महापालिकेला पूणॅ सहकायॅ करत आहेत. परंतु जीवनावशक्य वस्तू लोकांना मिळतील, याची सोय शासनाने करावी, अशी मागणी राज्य सरकारकडे केल्याचे वरळी कोळीवाडा ओनसॅ असोेशिएशनचे सचिव प्रल्हाद वरळीकर यांनी केली आहे. 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0