रोहित शर्माचा कोरोनाग्रस्त तसेच भटक्या कुत्र्यांसाठी मदतीचा हात

31 Mar 2020 15:06:21

rohit sharma_1  
मुंबई : कोरोना विषाणूचा कहर संपूर्ण जगभर पसरला आहे. अशामध्ये भारतामध्ये २१ दिवसांचे लॉकडाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केले. तसेच, कोरोना ग्रस्तांच्या मदतीसाठी सर्वांनी पुढे येऊन ‘पीएम केअर्स फंड’मध्ये आपापल्या परीने योगदान द्यावे असे आवाहनदेखील केले आहे. सर्व स्तरांमधून प्रतिसाद येत असताना भारताचा स्फोटक फलंदाज मुंबईकर रोहित शार्मानेदेखील स्वतःचे योगदान केले आहे. रोहितने वेगवेगळ्या फंडद्वारे लाखोंची मदत करून सर्वांसमोर एक नवा आदर्श ठेवला आहे.
 
 
 
 
 
रोहितने प्रधानमंत्री सहाय्यता निधीमध्ये ४५ लाख, मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये २५ लाख, ‘फिडिंग इंडिया’साठी ५ लाख तर रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांच्या देखभालीसाठी ५ लाख अशी एकूण ८० लाखांची आर्थिक मदत केली आहे. रोहितने ट्विट करत ही माहिती दिली आहे. कोरोणाचा सामना करण्यासाठी अनेक कलाकार, व्यापारी मंडळी, उद्योगपती, क्रीडापटू, संस्था आणि सर्वसाधारण जनता पुढे सरसावली आहे. तसेच, भटक्या कुत्र्यांसाठी त्याने केलेल्या देणगीबद्दल त्याचे विशेष कौतुक होत आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0