आयपीएलमुळे आशियाई स्पर्धा २०२० ढकलणार पुढे?

31 Mar 2020 17:53:26

bcci_1  H x W:
नवी दिल्ली : कोरोना विषाणू संसर्गाने जगभरात थैमान घातले आहे. अशामध्ये सर्वच क्षेत्राला याचा फटका बसला आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेक क्रीडा स्पर्धा पुढे ढकलल्या तर काही स्पर्धा रद्द करणायत आल्या आहेत. अशामध्ये भारतात आयपीएल २०२० ही २९ मार्चला सुरु होणार होती, ती १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलली. त्यानंतर अद्यापही आयपीएल रद्द होणार की पुढे जाणार यामध्ये साशंकता व्यक्त करणायत येत आहे. आयपीएलसाठी आता बीसीसीआय आशियाई स्पर्धा पुढे ढकलणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
 
 
आयपीएल स्पर्धाही बीसीसीआय तसेच भारतीय खेळाडूसाठी खूप मोठी संधी असते. तसेच, क्रीडा प्रेमींसाठी ही खूप मोठी पर्वणी असते. त्यामुळे आयपीएलचा १३वा हंगाम रद्द करणे हे बीसीसीआयला परवडण्यासारखे नाही. त्यामुळे टी रद्द होणार की नाही यावर अद्याप ठाम निर्णय होऊ शकलेला नाही. लॉकडाऊननंतरही सध्याची परिस्थिती पाहता ही स्पर्धा ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात खेळवण्यात येऊ शकते, अशी चर्चा रंगली आहे. असे झाल्यास आशिया चषक २०२० स्पर्धा पुढे ढकलण्यात येऊ शकते, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
 
 
भारतीय संघाच्या वेळापत्रकानुसार सप्टेंबरमध्ये आशिया चषक आणि इंग्लंडविरुद्धच्या तीन एकदिवसीय व तीन ट्वेंटी- २० सामन्यांचे आयोजन होणार आहे. याच काळात दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांच्यात दोन महिने क्रिकेट मालिका होणार आहे. जर परदेशी खेळाडूंचा सहभाग निश्चित होत असेल, तर बीसीसीआय आयपीएल ऑगस्ट-सप्टेंबर मध्ये खेळवू शकते. बीसीसीआय हा मुद्दा आशिया क्रिकेट परिषदेसमोर ठेवणार आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0