आज की नारायणी के लिए...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Mar-2020
Total Views |


vicco_1  H x W:



आपलं सर्वात जास्त प्रेम कशावर असतं माहित आहे? अर्थातच आपलं स्वत:चं शरीर म्हणजे देह! मानवी देह हा अमूल्य आहे. ८४ लक्ष योनीच्या फेर्‍यातून आपल्याला या ’नर’ देहाची प्राप्ती होते. त्यामुळे आध्यात्मिकदृष्ट्यादेखील ’मानवी देह’ महत्त्वपूर्ण आहे. आपण त्याचे फार चोचले पुरवितो. त्याला चांगलं सजवतो, धजवतो, त्याची निगा राखतो. आपले स्वत:वर नितांत प्रेम असते आणि हे ’व्यक्तित्व’ खुलवण्यासाठी आपण आपला पैसा, वेळ, श्रम खर्च करतो. सुंदर देहाचा आपल्याला किती अभिमान असतो!

 

देहाभिमान, जीवनाची नश्वरता याविषयीची साधुसंतांची वचने मनोमन पटतात, पण देहासक्ती काही केल्या सुटत नाही. अशा देहावर ऊन, वारा, पाऊस, थंडी यांचा परिणाम होतो आणि विविध व्याधी जडल्या की मानवाचे मन:स्वास्थ्य साफ बिघडून जाते. व्याधी/आजार नवजात बालकापासून ते वृद्धांपर्यंत कोणालाही जडू शकते. व्याधीमुळे होणार्‍या वेदनांमुळे व्यक्ती अगदी कासावीस होऊन जाते. वैद्यांच्या सल्ल्याने आणि औषधोपचाराने पथ्यपाणी सांभाळून आपण शरीराची गाडी पूर्वपदावर आणतो. परंतु prevention is better than cure हे माझं स्वत:चं आवडीचं तत्त्व आहे.

 

माझ्यातील उद्योजक घडताना मला जीवनविषयक काही तत्त्वांचा फार उपयोग झाला. A stich at time saves nine अर्थात वेळीच एक टाका घातला की बाकीचे नऊ टाके वाचतात. आपण अखंड सावधान असायला हवं. आरोग्यासंदर्भात मी स्वत: फार काळजी घेतो. शरीर एक यंत्र आहे आणि ते सुरळीत चालू असायला हवे़ आपल्या ’शरीराची चार चाकं आणि दोन नेत्रं’ (२ हात, २ पाय व २ डोळे) सुरळीत कशी चालतील हे प्रत्येकाने पाहावे. कारण, त्यावरच तुमची कार्यक्षमता टिकून राहणार आहे़ सळसळत्या उत्साहाची व्यक्ती कोणाला नाही आवडणार? सातत्याने आजारी पडणे बरे नव्हे!

 

’पुरेशी झोप, आराम आणि व्यायाम’ ही आरोग्यपूर्ण जीवनाची त्रिसूत्री आहे. आपला आहार संतुलित, पोषक असावा. आपली जीवनशैली तणावरहित ठेवण्याकडे लक्ष असावे. ‘चिता’ आणि ‘चिंता’ यात फक्त अनुस्वाराचा फरक आहे, पण त्या दोन्ही माणसाला जाळतात़. बर्‍याचदा शरीर श्रम पडले तरी हरकत नसते, पण मानसिक तणावाने जगणे नकोसे वाटते़ परमेश्वराची आपण एक नितांत सुंदर देणगी आहोत. तसेच आपल्या कुटुंबाचा आपण महत्त्वपूर्ण घटक असतो. आपल्यावर अवलंबून असणारे अनेक जण असतात. आपल्याला घडवण्यात कुटुंबाचा, समाजाचा वाटा फार मोठा आहे. त्यामुळे यापुढे कोणीही स्वत:ची हेळसांड करू नका. तुम्ही तुमच्या कुटुंबाचे मानसिक, आर्थिक ’आधारस्तंभ’ आहात. तुमचं निरोगी दीर्घायुष्य समाजाला हवं आहे़

 

काही दिवसांपूर्वीच ’हिंदवी स्वराज्याचे संस्थापक’ छत्रपती श्री शिवाजी महाराजांची जयंती दिमाखात साजरी झाली. शिवरायांना अवघं ५३ वर्षांचं आयुष्य लाभलं. हेच जर महाराज दीर्घायुषी असते तर? केवळ महाराष्ट्राचीच नव्हे, तर देशाची परिस्थिती बदलली असती. त्यांच्या निधनाने राष्ट्राचे किती नुकसान झाले नाही का? अनेक नामवंत समाजधुरिणांना केवळ आर्युमर्यादा कमी लाभली म्हणून त्यांच्या समाजकार्याला मर्यादा पडल्या. जगात कुणाचंच कुणावाचून अडत नाही, हे जरी खरं असलं तरी त्या एका व्यक्तीची किंमत तिच्या जवळच्या व्यक्तींनाच माहित असते. Show must go on, पण पदोपदी अडत असतं, हे मात्र खरं!

 

सर्वसाधारण आर्युमर्यादा १२० वर्षांची ॠषीमुनींनी गृहीत धरली होती़ दिनचर्या आणि नैसर्गिक वातावरणात लोक आरामात शंभरी गाठत होते़ तुलनेने लोकांमध्ये व्याधी मोठ्या प्रमाणात आढळतात. आतासारख्या पूर्वी सुखसुविधा, वैद्यकीय मदत नव्हती, तरीदेखील प्रत्येक व्यक्ती श्रम करत असे़ राहणीमान साधं होतं, गरजा कमी होत्या. समाजमनाची धारणा वेगळी होती. समाजात ’मानसिक एकोपा’ होता. त्यामुळे प्रत्येकाचे आत्मबल भिन्न होते. आनंदी आणि समाधानी वातावरण ठायी ठायी नांदत होते. आजच्या सारखी सार्वत्रिक मरगळ कुठेच नसे. थोडक्यात, जीवन साधे होते आणि माणसे सरळ होती.

 

शारीरिक कष्टांची सर्वांना सवय होती़ दिनचर्या अशी आखलेली होती की, समाजाच्या सर्व घटकांचा, सामाजिक आरोग्याचा आणि वैयक्तिक आरोग्याचा हिरीरीने विचार केला गेला होता़ निसर्गाने बहाल केलेल्या वनौषधींची पूर्वासुरींना जाणीव होती. म्हणूनच त्याचा वापर स्वयंपाकघरापासून करायला लावला. सौंदर्यवर्धक, आरोग्यवर्धक जडीबुटी यांनी कित्येक वर्ष-पिढ्या सांभाळल्या़ आजी पंचतत्त्वात विलीन झाली तरी ’आजीबाईचा बटवा’ समाजाचा अनमोल ठेवा पुढील पिढ्यांकडे सुपूर्द होत राहिला. आरोग्यविषयक समस्या निर्माण झाली की, तिच्यावर घरगुती उपचार होत. वैद्याकडे रामबाण उपाय होते. मुळात पराकोटीची श्रद्धा होती आणि या श्रद्धेवरच लोकांचे आजार बरे होत होते. आतादेखील ‘फॅमिली डॉक्टर’चे औषध एखाद्या तज्ज्ञ डॉक्टरपेक्षा लवकर लागू पडते याचे कारण पेशंटचा फार मोठा विश्वास! जर विश्वास आणि श्रद्धा नसेल तर जीवनात आपण पुढे जाऊ शकणार नाही. चराचरात परमेश्वर वसलेला आहे. जेथे चैतन्य आहे तेथे परमेश्वर आहे. भगवंत कधीही सगुण रुपात दर्शन देत नाही, तो भक्तासाठी कोणत्या तरी माध्यमातून आपली मदत उभी करतो. म्हणून ती अनोळखी व्यक्ती नेहमी ’देवदूत’ ठरते. रक्ताची माणसं जेव्हा पाठ फिरवतात तेव्हा काडीचाही संबंध नसलेली व्यक्ती पाठीशी उभी राहते़ तुमची श्रद्धा हवी़ भगवंताच्या चमत्कारांची गणती नाही. सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत व्यक्तीला शारीरिक हालचाली कराव्या लागतात. काही कामे बौद्धिक श्रमाची असू शकतात. शारीरिक श्रमात आलेला थकवा आराम केल्याने पळतो़ या दरम्यान काही दुखापती होतात, वेदना होतात. वयोमानानुसार शरीराची क्षमता कमी होत असते. शरीर थकते तसे व्याधी जोर धरू शकतात. काही आजार हे अनुवांशिक असतात, तर काही व्यक्तींच्या जीवनशैलीमुळे ओढावलेले असू शकतात. शरीरावर त्वचेचे आवरण असले तरी अंतर्गत भागात हाडे, स्नायू, रक्त असते. शरीर यंत्रणा सुरळीत असते तोवर ताण जाणवत नाही. परंतु, संबंधित कार्यात बिघाड निर्माण झाल्यास शरीरात कुठेतरी वेदना जाणवू लागते, त्याचा संदेश मेंदूला पोहोचतो आणि ’दुखतंय काहीतरी’ अशी भावना निर्माण होते. समस्या हाडांची, सांध्यांची, स्नायूंची असू शकते. वय झाल्यावर स्नायू लवचिक राहत नाहीत. त्यामुळे वारंवार दुखायला लागते. हळूहळू आपल्याला सवय होते, पण आजार काही हटत नाही. यासाठी सर्वप्रथम आपलं वय, जीवनशैली, आहार, व्यायाम याकडे आवर्जून लक्ष द्यायला हवे. म्हणजे बर्‍यापैकी समस्या आटोक्यात येतील.

 

१९५२ला ‘विको’चा प्रवास सुरु झाला आणि केवळ आयुर्वेदावर आधारित उत्पादने असतील असा चंग बांधला. तेव्हा लोकोपयोगी प्रसाधने/उत्पादने आणली गेली. समाजस्वास्थ्य हे प्रमुख उद्दिष्ट डोळ्यांसमोर होतं हातपाय दुखणे, सांधे दुखणे, कंबर मान दुखणे अशा प्रकारची दुखणी म्हणजे एक प्रकारची डोकेदुखी असते. आपण विविध उपाय करतो, पण ’रिलीफ’ काही मिळत नाही. म्हणून ‘विको’ परिवाराने अशा प्रकारच्या दुखण्यावर रामबाण उपाय म्हणून ’विको नारायणी जेल’ आणले. यामध्ये १६ प्रकारची वनौषधी आहेत. जसे राई तेल, निलगिरी तेल, देवदारु तेल, चहापाती तेल, लवंग तेल, रोशा तेल, दालचिनी, पुदिना, कापूर, विंटर ग्रीन, ओवा वगैरे यांचा वापर या जेलमध्ये केला जातो. त्यामुळे हे एक प्रकारचे आयुर्वेदिक मेडिसीन आहे.

 

याचे ‘साईड इफेक्टस्’ नाहीत. हे त्वचेमध्ये जिरते. कपडे, हात खराब होत नाहीत़ रात्री हलक्या हाताने चोळून जिरवल्यावर शांत झोप लागते़ दुखण्याला आराम पडतो़ ‘विको’च्या ’नारायणी जेल’मुळे स्नायूदुखी, मानदुखी, कंबरदुखी, हाडे दुखणे यावर उतारा मिळाला़ यातील आयुर्वेदिक घटक वेदनेच्या मुळाशी जाऊन दुखणे दूर करतात. बहुतांश स्त्रियांना कंबरदुखीचा त्रास होतोच होतो. घराचा ’बॅकबोन’ असणारी स्त्री पाठदुखीने बेजार झाली की संपूर्ण घराचं कंबरडंच मोडतं ‘विको’च्या जाहिरातीतदेखील ’आज की नारायणी के लिए’ असे आवर्जून म्हटलेले आहे. अनेक समस्यांवर एक उपाय म्हणजे ’विको नारायणी जेल’ आणि कालसुसंगत असे ’विको नारायणी स्प्रे’ बाहेर नेण्यास अगदी सोपे ठरते़. हे सर्व करण्यामागची भूमिका ही होती की पूर्वापार चालत आलेली आयुर्वेदाची परंपरा खंडित होऊ देऊ नये. लोकांना नैसर्गिक व शुद्ध स्वरुपात उपचार मिळावेत शेवटी ’बहुजन हिताय। बहुजन सुखाय।’ हेच जीवनाचे सूत्र असावे.

 

- संजीव पेंढरकर

 
 
 
@@AUTHORINFO_V1@@