इंडोनेशियाचे ८ धर्मप्रचारक बिजनोरच्या मशिदीमध्ये लपले ; सात जणांवर गुन्हे दाखल

31 Mar 2020 19:20:37

delhi news_1  H
 
 
नवी दिल्ली : दिल्लीतील 'तब्लीग-ए-जमात' या कार्यक्रमात सहभागी झालेल्या बहुतांश व्यक्तींमध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आली. त्यानतंर देशभरामध्ये एक भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या कार्यक्रमात सहभागी झालेले इंडोनेशियातील ८ धर्मप्रचारक बिजनौर शहरांमधील नागीनाजमुन मस्जिदमध्ये सापडले. उत्तर प्रदेश प्रशासनाने त्यांना मस्जिदीमधून बाहेर काढत त्यांचे मेडिकल चेकअप केले. त्यानंतर त्यांना होम क्वारंटाइन केले आहे.
 
 
 
महत्त्वाची बाब म्हणजे ते ज्या मस्जिदीमध्ये लपले होते तेथील मौलाना आणि इतर सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. “हे लोक नगीना येथील जमीना मशिदीत राहत होते. हे लोक यापूर्वी दिल्लीत मुक्काम करून तेथून बिजनौरला आले होते. ते सर्व इंडोनेशियन नागरिक आहेत. हे सर्व जण बांगलादेशमार्गे ओडिशाला पोचले आणि तेथून दिल्लीला पोहोचले. २१ मार्च रोजी हे लोक नगीनाच्या मशिदीमध्ये आले. त्यांच्यासमवेत अनुवादकही होते. मौलवीसह पाच जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.” अशी माहिती बिजनौरचे पोलिस अधीक्षक संजय सिंह यांनी ही माहिती दिली.
Powered By Sangraha 9.0