दिलासादायक! देशात आतापर्यंत १०२ रूग्ण कोरोनामुक्त

31 Mar 2020 14:53:30

corona_1  H x W
नवी दिल्ली : देशामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशातच एक दिलासादायक बाब म्हणजे, देशातील एकूण कोरोना बाधितांपैकी एकूण १०२ रूग्णांना कोरोनामुक्त करण्यात डॉक्टरांना यश आले आहे. त्यांच्या कोरोना तपासणीचा अहवाल नेगेटिव्ह आल्यानंतर त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

कोरोनावर मात करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी संपूर्ण देश लॉकडाऊन करण्याची घोषणा केली होती. कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी अनेक देशवासियांनी स्वयंस्फूर्तीने घरात राहणे पसंत केले. त्यामुळे कोरोनाचा प्रसार होण्यास अटकाव होत आहे. महाराष्ट्रात २५ , केरळमध्ये १६ , उत्तरप्रदेशमध्ये ११ , हरियाणामध्ये १७ , कर्नाटकात ५ , दिल्लीमध्ये ६ , तमिळनाडूत ४ , लडाखमध्ये ३, राजस्थानमध्ये ३, हिमाचल प्रदेशमध्ये २ , उत्तराखंडमध्ये २ , तेलंगणा, गुजरात, जम्मू-काश्मीर, पंजाब आणि आंध्रप्रदेशमध्ये प्रत्येकी एक-एक रूग्ण कोरोनामुक्त झाला आहे.

देशात जीवघेण्या कोरोना व्हायरसमुळे हैदोस घातला असून कोरोनाचा संसर्ग झालेल्यांचा आकडा ११००० हजार पार गेला आहे. देशातील २७ राज्यांमध्ये कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत ११४० लोकांना संसर्ग झाला आहे. तर २७ लोकांचा मृत्यू झाला आहे. दोन राज्य केरळ आणि महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग झालेल्या रूग्णांची संख्या 200 पार पोहोचली आहे.
Powered By Sangraha 9.0