महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने, अभयारण्ये ३० एप्रिलपर्यंत बंद

30 Mar 2020 21:04:38
tiger_1  H x W:
 

 कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय

 
मुंबई (प्रतिनिधी) - राज्यातील सर्व राष्ट्रीय उद्याने, अभयारण्ये आणि वन्यजीव संरक्षित क्षेत्र ३० एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय वन विभागाने घेतला आहे. यापूर्वी हा निर्णय १५ एप्रिलपर्यंत लागू होता. मात्र, राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता या कालवधीमध्ये वाढ करण्यात आली आहे.
 
 
 
राज्यात कोरोनामुळे जनजीवन ठप्प आहे. पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेली वन्यजीव संरक्षित क्षेत्र देखील बंद आहेत. देशात लाॅकडाऊन जाहीर होण्यापू्र्वीच ही क्षेत्र १५ एप्रिलपर्यंत बंद करण्याचा निर्णय वन विभागाने घेतला होता. आता या कालावधीत वाढ करण्यात आली आहे. राज्यातील सर्व वन्यजीव संरक्षण क्षेत्रातील पर्यटन ३० एप्रिलपर्यंत बंद करण्याचा निर्णय प्रधान मुख्य वनसंरक्षकांकडून घेण्यात आला आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊनच हा निर्णय घेण्यात आला आहे. म्हणजेच पुढील महिनाभरासाठी राज्यातील राष्ट्रीय उद्याने आणि अभयारण्यांची दारे पर्यटनासाठी बंद असणार आहेत.
Powered By Sangraha 9.0