पाक हिंदू शरणार्थींना रा.स्व.संघातर्फे मदत

30 Mar 2020 14:04:35
RSS swayansevak_1 &n
 
 
 
नवी दिल्ली : लॉकडाऊनमुळे प्रत्येकजण आपापल्या राज्यात जाण्यासाठी धडपडत आहे, तिथे पाकिस्तानातून भारतात आलेले शरणार्थींसमोरही अन्न-पाण्याचा प्रश्न आहे. केंद्र सरकारकडे आशा लावून बसलेल्या या हिंदू शरणार्थींसाठी रा.स्व.संघाने पुढाकार घेतला आहे. त्यांना नागरिकत्व दुरुस्ती विधेयक पारित झाल्यानंतरही भारतातील रहिवासी मानण्यासाठी नकार दिला मात्र, रा.स्व.संघ स्वयंसेवक त्यांच्या मदतीला धावून आले आहेत.
 
 
संघ स्वयंसेवकांनी या शरणार्थींची भेट घेतली. तिथली परिस्थिती जाणून घेतली आणि त्यांना पुरेल असा अन्न धान्य आणि जीवनावश्यक वस्तूंचा साठा दिला. या संदर्भातील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आदर्श नगर येथील हिंदू शरणार्थींना ही मदत पोहोचवली आहे.
 
 
रा.स्व.संघ स्वयंसेवकांनी केवळ हिंदू शरणार्थीच नव्हे तर जिथे जिथे गरज आहे तिथे ही मदत पोहोचवली आहे. देशभरातील स्वयंसेवकांनी एकत्र येत अन्नपूर्णा अभियान सुरू केले आहे. लॉकडाऊनच्या काळात कुणीही उपाशी राहणार नाहीत, याची दक्षता प्रत्येक राज्यात घेतली जात आहे.
Powered By Sangraha 9.0