वरळी कोळीवाडा सील; पाच कोरोना बाधित रुग्ण आढळले

30 Mar 2020 14:17:52
worli_1  H x W:

पाचपैकी कोणीही परदेश दौरा केला नव्हता

मुंबई (प्रतिनिधी) - वरळी गावामधील प्रसिद्ध कोळीवाडा पोलीसांनी सील केला आहे. कोळीवाड्यात कोरोना बाधित पाच रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. या पाचपैकी कोणीही परदेश दौरा केला नव्हता. कोरोनाचा प्रसार आता मुंबईतील वाड्या वस्त्यांमध्ये होऊ लागल्याने प्रशासनासमोर आव्हान उभे राहिले आहे.
 
 
 
 
मुंबईत कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. आता कोरोनाचा संसर्ग शहरातील छोट्या वाड्या वस्त्यांमध्ये होऊ लागला आहे. यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. वरळी कोळीवाड्यातील पाच जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आहे. यांचे वय ५० वर्षांच्या पुढे असल्याचे समजते आहे. परंतु, यापैकी कोणीही परदेश दौरा केलेला नाही. त्यामुळे या लोकांना कोरोनाची लागण कशी झाली, हे शोधण्याचे आव्हान आता प्रशासनासमोर आहे. दरम्यान प्रशासनाने खबरदारी घेत हा सील केला आहे. हे पाचही रुग्ण ज्या ज्या व्यक्तींच्या संपर्कात आले आहेत त्यांची माहिती काढून तपासणी करण्यात येत आहे. शिवाय परिसराच्या निर्जुंतीकरणाची प्रक्रिया प्रशासनाने हाती घेतली आहे.
Powered By Sangraha 9.0