कराचीमधील हिंदूंना अन्नधान्य देण्यास पाकिस्तानचा नकार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Mar-2020
Total Views |
hindu_1  H x W:
 
 

पाकिस्तानमधील हिंदू अल्पसंख्यांक धोक्यात

 
 
मुंबई (प्रतिनिधी) - कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या कठीण प्रसंगात पाकिस्तानचा अमानवीय चेहरा पुन्हा एकदा समोर आला आहे. कोरोनामुळे पाकिस्तानमध्ये लाॅकडाऊन आहे. अशा कठीण प्रसंगात पाकिस्तान प्रशासनाने कराचीमधील हिंदू नागरिकांना अन्नधान्य देण्यास नकार दर्शवला. हिंदूना जीवनावश्यक वस्तू पुरवण्यास प्रशासनाने नकार दिला आहे.
 
 
 
 
जगावर कोरोना व्हायरचे संकट ओढावले आहे. या परिस्थितीत भारतातील नागरिक जात, धर्म, पंथ न पाहता एकमेकांच्या मदतीला धावून येत आहे. मात्र, पाकिस्तानाने धर्मभेदाला सुरुवात केली आहे. पाकिस्तानमध्ये कोरोना व्हायरसाचा प्रादुर्भाव वाढला आहे. भारताप्रमाणे तिथेही लाॅकडाऊन घोषित करण्यात आले आहे. पाकिस्तानाकडून नागरिकांना अन्यधान्य आणि जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येत आहे. मात्र, अल्पसंख्याक हिंदूना त्यापासून दूर ठेवले जात आहे. कराचीच्या केरेहडी घोथ या भागात हजारांहून अधिक लोक अन्नधान्य आणि रोजच्या गोष्टी घेण्यासाठी जमले होते. सरकारकडून गरीब कामागारांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येणार होते. परंतु, तिकडे जमलेल्या हिंदूच्या पदरी निराशा पडली. हिंदूंना तिकडून जाण्यास सांगून हे अन्नधान्य केवळ मुस्लमानांसाठीच असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. राजकीय कार्यकर्ते डॉ. अमजद अयूब मिर्झा यांनी सांगितले की, पाकिस्तानामधील अल्पसंख्यांकांना आता अन्नधान्याचा पुरवठा होण्याच्या दृष्टीने संकट ओढावणार आहे. मिर्झा यांनी सिंधमधील मानवतावादी संकटाला आळा घालण्यासाठी पंतप्रधान मोदींनी उशीर न करता हस्तक्षेप करण्याचे आवाहन केले आहे.
@@AUTHORINFO_V1@@