कोरोनाग्रस्तांसाठी पाऊल पुढे ! बीसीसीआयने केली ५१ कोटींची मदत

30 Mar 2020 14:37:20
 
bcci_1  H x W:
 
 
 
मुंबई : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव हा सर्वाधिक महाराष्ट्रामध्ये झाला आहे. तसेच देशभरामध्ये कोरोनाबाधीतांचा आकडा हजारावर गेला आहे. यावर बीसीसीआयने बैठक बोलावत अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. बीसीसीआयने कोरोनाग्रस्तांच्या उपचारासाठी तब्बल ५१ कोटींची मदत जाहीर केली आहे. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली, सचिव जय शहा आणि इतर अधिकाऱ्यांनी बैठकीत याबद्दल निर्णय घेतला. कोरोनाविरोधातील लढ्यात देशातील आपत्कालीन सुविधेला अधिक बळ मिळावे, असे बीसीसीआयने परिपत्रक काढून जाहीर केले आहे.
 
 
 
याआधी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने कोरोना ग्रस्तांसाठी ५० लाख रुपये खर्च करून गोरगरिबांना मोफत तांदूळ वाटप करणार आहे. लॉकडाऊनच्या काळामध्ये हातावर पोट असलेले मजूर अडचणींचा सामना करत आहे. यासाठी त्याने हे पाऊल पुढे टाकले आहे. तसेच, मुंबई क्रिकेट असोसिएशनतर्फे कोरोनाविरोधातील लढाईसाठी मुख्यमंत्री निधीला ५० लाख रुपयांची आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. तर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि पंतप्रधान सहाय्यता निधीला प्रत्येकी २५ लाखांची मदत केली आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0