भारतीय क्रिकेटप्रेमींसाठी पर्वणी ; पुन्हा एकदा अनुभवा भारत-पाक सामन्यांचा थरार

30 Mar 2020 16:05:16

ind pak_1  H x
मुंबई : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे भारतामध्ये लॉकडाऊन करण्यात आला आहे. अशावेळी सर्वांना घरी बसण्याचे आवाहन केले जात आहे. घरी बसलेल्या नागरिकांचे मनोरंजन व्हावे म्हणून सर्व प्रसारमाध्यमांनी वेगवेगळ्या युक्त्या वापरत आहेत. स्टार स्पोर्ट वाहिनी क्रिकेटप्रेमींसाठी पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तानमधील सामन्यांचे पुर्नप्रक्षेपण करणार आहे. ४ ते १० एप्रिल या काळात सकाळी ११ वाजता हे सामने दाखवण्यात येणार आहेत.
 
भारतीय संघाचे यंदाच्या वर्षातले वेळापत्रक पाहता जुन-जुलै महिन्यापर्यंत भारत एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळणार नाही आहे. बीसीसीआय आयपीएल रद्द करण्याच्या मार्गावर असून खास क्रिकेट चाहत्यांसाठी हा बेत असल्याचे स्टार स्पोर्ट्सने जाहीर केले.
 
 
असे असेल वेळापत्रक
 
 
१) ४ एप्रिल – १९९२ चा विश्वचषक
२) ५ एप्रिल – १९९६ चा विश्वचषक
३) ६ एप्रिल – १९९९ चा विश्वचषक
४) ७ एप्रिल – २००३ चा विश्वचषक
५) ८ एप्रिल – २०११ चा विश्वचषक
६) ९ एप्रिल – २०१५ चा विश्वचषक
७) १० एप्रिल – २०१९ चा विश्वचषक
 
 
 
Powered By Sangraha 9.0