पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शेअर केला योगा व्हिडिओ!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Mar-2020
Total Views |

modi yoga_1  H


व्हिडिओ शेअर करत सांगितलं आपल्या फिटनेसचं रहस्य...


मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योगा व्हिडिओ शेअर करत आपल्या फिटनेसचं रहस्य सांगितलं आहे. मोदींनी आपल्या ट्विटर हँडलवरून आपल्या व्यायामासंदर्भात माहिती दिली आहे. यात त्यांनी म्हटलं आहे की, 'मी फिटनेस तज्ञ किंवा वैद्यकीय तज्ज्ञ नाही. योगाभ्यास करणे हा बर्‍याच वर्षांपासून माझ्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. मला तो फायदेशीर वाटला आहे. मला खात्री आहे की, तुमच्यापैकी बर्‍याच जणांकडे तंदुरुस्त राहण्याचे इतरही मार्ग आहेत जे तुम्ही इतरांशीही शेअर केले पाहिजेत,' असं आवाहनही मोदींनी नागरिकांना केलं आहे.


रविवारी नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात' या कार्यक्रमात जनतेशी संवाद साधला. यात त्यांना त्यांच्या तंदुरुस्तीसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. त्यामुळे आज मोदींनी आपल्या ट्विटर हँडलवरून आपल्या फिटनेसचं रहस्य सांगितलं आहे. यात त्यांनी एका योगा व्हिडिओची लिंक शेअर केली आहे.





मोदींनी शेअर केलेला हा व्हिडिओ विविध भाषांमध्ये उपलब्ध आहे. त्यामुळे कोणीही या व्हिडिओच्या साहाय्याने योगा शिकू शकतो. यासाठी कोणत्याही योगगुरूची आवश्यकता नाही. सध्या संपूर्ण देशात लॉकडाऊन परिस्थिती आहे. त्यामुळे सर्व जिम बंद आहेत. नागरिक लॉकडाऊन काळात आपल्या फिटनेससाठी हा व्हिडिओ पाहून योगसाधनेचा आनंद घेऊ शकतात.


दरम्यान, अनेक कलाकारांनी लॉकडाऊन काळात फिटनेससाठी घरच्या घरी कोणते व्यायाम करावे, यासाठी काही व्हिडिओ शेअर केले आहेत. हे व्हिडिओ पाहून तुम्ही आपला फिटनेस वाढवू शकता. कोरोनाचा प्रतिकार करण्यासाठी आपल्या शरीरात रोग प्रतिकारशक्ती असण गरजेचं आहे. यासाठी आपला फिटनेस अतिशय महत्त्वाचा आहे. त्यामुळे तुम्हाला दररोज व्यायाम किंवा योगसाधना करून आपला फिटनेस नक्की वाढवता येईल.
@@AUTHORINFO_V1@@