मजुरांचे स्थलांतर रोखण्यात दिल्ली ठरतेय अपयशी

30 Mar 2020 09:28:16
delhi migrant_1 &nbs


लॉकडाऊनसंदर्भातील आदेशांचे पालन करण्यात अपयशी ठरल्याने चार अधिकाऱ्यांवर कारवाई



दिल्ली : केंद्र सरकारने दिल्ली सरकारमधील २ वरिष्ठ अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. याशिवाय आणखी दोन अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. कामात हलगर्गीपणा आणि लॉकडाऊनच्या नियमांचे पालन न केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. दिल्ली सरकारमधील जे दोन अधिकारी निलंबित केले आहेत त्यात अतिरिक्त मुख्य सचिव (वाहतूक) आणि मुख्य सचिव (वित्त)यांचा समावेश आहे. दिल्लीतील मजुरांचे स्थलांतर रोखण्यात अपयश आले ही कारवाई करण्यात आली आहे.


लॉकडाऊनसंदर्भातील आदेशांचे पालन करण्यात अपयशी ठरल्याने या वरिष्ठ अधिकाऱ्यावर कारवाई झाली आहे, असे केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. तर ज्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना नोटीस दिली गेली त्यात अतिरिक्त मुख्य सचिव (गृह आणि जमीन व्यवस्थापन ) आणि दुसरे अधिकारी सीलमपूरचे एसडीएम आहेत. या चौघांवर कामात हलगर्जीपणाचा ठपका ठेवत त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे.


कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यात घोषित झालेल्या लॉकडाऊनमध्ये हे अधिकारी नागरिकांना सुरक्षा आणि त्यांचे आरोग्याची काळजी राखण्यात अपयशी ठरले, अधिकाऱ्यांवर कारवाई करताना केंद्रीय गृहमंत्रालयाने स्पष्ट केले आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २४ मार्चला २१ दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला. यानंतर देशाच्या विविध शहरांमधून मजूर आणि कामगारांचे आपल्या गावी स्थलांतर सुरू झाले. शेकडो किलोमीटर असलेल्या गावाकडे ते पायीच निघाले. दिल्लीत शनिवारी रात्री सर्वात वाईट स्थिती बनली. आनंद विहार, आणि धौला कुआं येथील बस स्थानकांमध्ये १५ हजारांहून अधिक मजूर आणि कामगारांनी गर्दी केली. उत्तर प्रदेश सरकराने बसची व्यवस्था केल्याने एकाचवेळी हजारोंची गर्दी झाली. चेंगराचेंगरीची परिस्थिती बस स्थानकांवर निर्माण झाली होती.



Powered By Sangraha 9.0