कोरोनाला नॉकआउट करण्यासाठी मेरी कॉम देणार एक महिन्याचा पगार

    दिनांक  30-Mar-2020 18:45:03
|

mary kom_1  H x
नवी दिल्ली : कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी देशभरामध्ये अनेक नामी व्यक्तींनी मदतीचा हात पुढे केला आहे. कोरोनाला चित्तपट करण्यासाठी आता भारतीय महिला बॉक्सर मेरी कॉमदेखील पुढे आली आहे. सहावेळा जागतिक अजिंक्यपद स्पर्धेचं विजेतेपद पटकावणारी महिला बॉक्सर आणि राज्यसभा खासदार असलेल्या मेरी कोमने आपला एका महिन्याचा पगार पंतप्रधान सहायता निधीला देण्याचं जाहीर केले आहे.
 
 
 
‘सध्या देशामध्ये करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता, मला एका महिन्याचा पगार पंतप्रधान सहायता निधीला द्यायचा आहे. माझ्या खात्यातून १ लाख रुपये पंतप्रधान सहायता निधीला देण्यात यावे, असे पत्रच मेरी कॉमने आपल्या बँकेच्या अधिकाऱ्यांना लिहीले. २०१६ साली मेरी कोमची राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली होती. मेरीने राष्ट्रकुल आणि आशियाई खेळांचे विजेतेपद पटकावले आहे. आपल्या पगाराव्यतिरीक्त मेरी कॉमने आपल्या खासदार निधीतून एक कोटींचा निधी मदतकार्याला द्यायचादेखील निश्चय केला आहे.
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.