कौतुकास्पद ! १५ वर्षीय खेळाडूने केली कोरोनाग्रस्तांना मदत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Mar-2020
Total Views |

isha sihn_1  H
मुंबई : कोरोणाचा विळखा भारतभर वाढत चालालला आहे. अशामध्ये देशभरातून अनेकजण स्वतःला जमेल तितकी मदत कोरोना ग्रस्तांच्या उपाययोजनेसाठी करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पीएम केअर्समध्ये पैसे टाकून अनेकांनी स्वतःचे योगदान दिले आहे. परंतु, ‘मदतीला माणसाचे मन मोठे असावे लागते कीर्ती नाही’. याचे उत्तम उदाहरण म्हणजे १५ वर्षीय भारतीय नेमबाज इशा सिंह हिने पंतप्रधान निधीमध्ये ३० हजार रुपयांची मदत करून एक आदर्श लोकांच्या डोळ्यासमोर ठेवला आहे.
 
 
 
 
इशा सिंह हिचे सोशल मिडीयावर नेटकऱ्यांकडून कौतुकांचा वर्षाव करत आहेत. इशाने या मदतीसंदर्भात सोशल मीडियावर ट्विट केले आहे. महत्वाचे म्हणजे तिचे ट्विट केंद्रीय मंत्री किरण रिजीजू यांनी रिट्विट करून इशाचे कौतुक केले आहे. त्यांनी या ट्विटमध्ये सांगितले आहे की, “तू अवघ्या १५ वर्षांची असूनही खरी चॅम्पियन आहेस.” आतापर्यंत अनेकजणांनी पुढे येऊन कोरोनाशी लढण्यासाठी मदत जाहीर केली आहे.
@@AUTHORINFO_V1@@