"पैसे मिळतील, बिर्याणी मिळेल', असे म्हणत आंदोलनाला पाठवायचे"

03 Mar 2020 11:43:38
Women takes part in caa p
 

 
 

महिलेच्या खुलाशामुळे आंदोलकांची पोलखोल



नवी दिल्ली : नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाच्या विरोधात अलीगढमध्ये केल्या जाणाऱ्या आंदोलनाचा पर्दाफार्श करण्यात उत्तर प्रदेश पोलीसांना यश आले आहे. एका महिलेने जेवण आणि पैशांच्या आमिषापोटी मला आंदोलनाला पाठवण्यात आले होते, अशी कबुली पोलीसांना दिली आहे.
 
 
अलीगढमध्ये सुरू असलेल्या प्रदर्शन मागे घेण्यात आल्यानंतर पोलीसांना या विभागाचा दौरा सुरू केला. यात ज्या महिला आंदोलक सहभागी झाल्या होत्या त्यांच्या घरी पोलीसांनी भेट दिली आहे. मात्र, यातील चौकशीत धक्कादायक खुलासा या आंदोलकांनी केला आहे. महिलांनी केलेले हे आंदोलन बरेच यशस्वी झाले होते. मात्र, दैनंदिन जीवनात येणाऱ्या अडथळ्यांमुळे पोलीसांना आंदोलकांना पांगवावे लागले.
 
 
यानंतर पोलीसांनी आंदोलकांची घरी जाऊन भेट घेतली. या भेटीदरम्यान केलेल्या चौकशीत आपला पती जबरदस्ती जेवण आणि पैशांसाठी मला आंदोलनात पाठवत होता, असा आरोप महिलेने केला आहे. पोलीसांनी या प्रकाराचे चित्रिकरणही केले. हा व्हीडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. आंदोलन हे बिर्याणी आणि पैशांसाठी होत असल्याचीही कबुली त्यांनी दिली.
 
या भागात दंगलीविषयक अफवा पसरवल्या जात होत्या तसेच महिलांना जबरदस्तीने आंदोलनासाठी पाठवले जात असल्याचा संशय पोलीसांना आला होता. त्यामुळे या भागाचा दौरा करण्यात आला. या दरम्यान महिलेने आंदोलकांची चांगलीच पोलखोल केली आहे. पोलीसांनी महिलेच्या पतीला नोटीस बजावले आहे. सोमवारी दुपारी फिरदौस नगर स्थित एका महिलेच्या घरी पोलीस पोहोचले. पोलीस अधिकाऱ्यांनी पत्नी आंदोलनाला जाते का, असा सवाल विचारला.








याचवेळी घरातील महिला धावत बाहेर आली आणि आपल्या पतीनेच मला बाहेर आंदोलन करायाला जाण्यासाठी सांगितले असा आरोप तिने केला. शाहीनबाग, अलिगड किंवा नवी दिल्लीतील आंदोलने या सगळ्याच आंदोलनाला पैसा पुरवला जात असल्याचा आरोप वारंवार केला जात होता. त्यानंतर अनेकदा अशी प्रकरणे उघडकीस आली होती.








Powered By Sangraha 9.0