‘संस्कृति संवर्धन प्रतिष्ठान’च्या नैतिक शिक्षण उपक्रमांतर्गत पुरस्कार वितरण संपन्न

03 Mar 2020 21:48:22

sankritisanvardhan_1 



मुंबई : ‘संस्कृति संवर्धन प्रतिष्ठान’च्या नैतिक शिक्षण उपक्रमांतर्गत नुकतेच ठिकठिकाणी पुरस्कार वितरण संपन्न झाले. शैलेंद्र विद्यामंदिर, दहिसर (पूर्व) आणि सह्याद्री विद्यालय, भांडुप (प.) सर्वोतम शाळा.‘संस्कृति संवर्धन प्रतिष्ठान’च्या नैतिक शिक्षण उपक्रमांतर्गत पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन दहिसर पूर्वेच्या समाजकल्याण सभागृहात करण्यात आले होते. यावेळी दहिसरमधील शैलेंद्र विद्यालय आणि भांडुपच्या सह्याद्री शाळेने ‘सर्वोत्कृष्ट शाळा पुरस्कार’ पटकावला. विद्यार्थी, पालक आणि नागरिकांच्या भरगच्च उपस्थितीमध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमाला शिक्षणतज्ज्ञ सुरेश देवळे, सुपरिचित स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. शोभा नगर्सेकर,सुप्रसिद्ध उद्योगपती कृष्णा गुप्ता आदी मान्यवर उपस्थित होते.“रामायण, महाभारतातील जीवनमूल्ये आदर्शवाद सांगणारी आहेत. पिढ्या घडविण्याचे कार्य या ग्रंथांनी केले आहे. संस्कारांचे आणि संस्कृतीचे सिंचन करण्याचे महान कार्य हाती घेणार्या प्रतिष्ठानला आपल्यापैकी प्रत्येक संवेदनशील व्यक्तीने सहकार्य केले पाहिजे, ”असे कळकळीचे आवाहन शिक्षणतज्ज्ञ सुरेश देवळे यांनी यावेळी केले.


‘संस्कृति संवर्धन प्रतिष्ठान’ गेली १६ वर्षे नैतिक शिक्षणाच्या क्षेत्रात कार्य करीत आहे. यावर्षी ९०० शाळांमधील १ लाख, ३५ हजार विद्यार्थी या उपक्रमात सहभागी झाले. त्यातील विशेष प्राविण्य मिळविणार्या १ हजार, ३३५ विद्यार्थ्यांना सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदके देऊन गौरविण्यात आले. यात ३५ मुस्लीम विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. महाराष्ट्रातील मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, बुलडाणा, जळगाव, नागपूर, औरंगाबाद, पुणे तसेच महाराष्ट्राबाहेर गोवा, केरळ आणि राजस्थान या प्रांतात सदर उपक्रम राबविला जातो. यंदा संपूर्ण महाराष्ट्रात ३६ ठिकाणी पारितोषिक वितरण कार्यक्रम संपन्न होत आहेत. या उपक्रमांतर्गत उल्लेखनीय कार्य करणार्या सुरेखा वाकचौरे, अश्विनी पोटे, स्मिता पळशीकर, सोनल शिंदे, ललिता जाधव, सुनील बाविस्कर, सखी कांबळी, संगीता डिमेलो, सिद्धेश दीक्षित, भाग्यश्री गुरव, वृषाली गायकवाड, फाल्गुनी प्रभू, राजकुमार थोरात, विनया संखे, एस. डी. रामाणे, युवराज कलशेट्टी, सुहास गावंड, शशांक खानापूरकर, रीता यादव, ऋतुजा मोरे, कीर्तिदा त्रिवेदी, पवनगीत भातनकर, संजीवनी सकपाळ, अशोककुमार दुबे, उर्मिला सिंह, स्मिता नायर, संगीता प्रजापती, विजय गोळे, वैशाली डोल्हारकर, सुरेखा पाटील आदी शिक्षकांना ‘गुरू द्रोणाचार्य आदर्श शिक्षक पुरस्कारा’ने गौरविण्यात आले. त्याशिवाय नीला मेहेर, निलेश गोतरणे आणि उदय जोगळेकर यांना आदर्श मुख्याध्यापक मानपत्र आणि शुद्ध चांदीचे पदक देऊन सन्मानित करण्यात आले. पुण्याच्या ज्ञानप्रबोधिनी शाळेला पुणे विभागातून ‘आदर्श शाळा चषक’ देण्यात आला.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुवर्णा देव, दत्ताराम नाईक, प्रसाद संसारे, सुचित्रा परब, उज्ज्वला शेटे, संगीता कुरणकर, प्रेरणा सुर्वे, प्रकाश वाड, दीपिका गावडे, कल्याणराव पारगावकर, डॉ. अजित जगताप यांनी विशेष परिश्रम घेतले.
Powered By Sangraha 9.0