धक्कादायक! दिल्ली-हैदरपूर भागात आढळले हॅंडग्रेनेड

03 Mar 2020 16:20:00
hand-grenade_1  




एनएसजीकडून तपास सुरू


नवी दिल्ली : दिल्लीतील हैदरपूर गावात हॅंडग्रॅनेड आढळल्याने खळबळ उडाली आहे. गंजलेल्या अवस्थेत आढळलेल्या या हॅंडग्रॅनेडची तपासणी एनएसजीच्या पथकाने सुरू केली आहे. हा प्रकार उघडकीस आल्यावर स्थानिकांनी पोलीसांना माहिती दिली होती. पोलीसांनी हॅंडग्रॅनेड ताब्यात घेतले. यानंतर पोलीसांनी एनएसजीला पाचारण केले. या प्रकारामागे कुठला कट तर नाहीना याची तपासणी एनएसजीचे पथक करत आहे. 
 
हॅंडग्रॅनेडचा अशाप्रकारे बेकायदा वापर दहशतवादीच करतात. सुरक्षा दल आणि निरपराध नागरिकांवर दहशत पसरवण्यासाठी अशा स्पोटकांचा वापर केला जाऊ शकतो, अशी शंका पोलीसांना आहे. यापूर्वीही दहशतवाद्यांकडे अशाप्रकारची सामग्री आढळलेली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून एनएसजीने परिसर ताब्यात घेतला आहे. पोलीसही यामागे कुठले षडयंत्र नाही ना याचा तपास घेत आहेत. रविवारपासून दिल्ली आणि इतर परिसरांत अफवा पसरवणाऱ्यांविरोधात पोलीसांनी कडक कारवाई सुरू केली आहे. हिंसाचार उसळलेल्या भागांत कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अफवा पसरवणाऱ्यांची खैर नाही, असा इशारा पोलीसांनी दिला आहे.
 
Powered By Sangraha 9.0