'भाऊ'चा बर्थडे... महाराष्ट्राचा लाडका भाऊ झाला ५०चा !

03 Mar 2020 12:03:39

bhau kadam_1  H
 
 
मुंबई : 'फु बाई फु', 'चला हवा येऊ द्या'च्या माध्यमातून सर्वांनाच खळखळून हसवणारा, आपल्या विनोदी स्टाइलने सर्वांच्या मनात घर बनवणारा अभिनेते भालचंद्र पांडुरंग कदम उर्फ भाऊ कदमचा सोमवारी ५०वा वाढदिवस साजरा करण्यात आला. भाऊ कदम यांच्या अस्सल विनोदी अभिनयाने सर्वांची मने जिंकली आहेत.
 
 
 
 
 
भाऊ कदम हा नेहमीच रसिकांच्या चेहऱ्यावर हास्य उमटवत असतो. मात्र त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या मित्र परिवाराकडून त्याच्यासाठी खास सरप्राईज पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये कुटुंबासह जवळच्या नातेवाईक मित्रांसह त्याने त्याचा हा खास दिवस साजरा केला.
 
 
मोठ्या उत्साहामध्ये भाऊ कदमचा वाढदिवस साजरा करण्यात आला. सर्वांकडून प्रेम मिळाल्यामुळे भाऊ कदम भारावून गेला. दिग्दर्शक रवी जाधवने या सेलिब्रेशनचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. यामध्ये त्याच्या चेहऱ्यावरील आनंद स्पष्ट दिसत होता. त्याच्यावर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव केला गेला. अनेकांकडून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या गेल्या.
 
 
Powered By Sangraha 9.0