इच्छाशक्तीच्या जोरावर तिने केली कोरोनावर मात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Mar-2020
Total Views |


muradabd_1  H x


मुरादाबाद : जगण्याच्या तीव्र इच्छाशक्तीच्या जोरावर प्राणघातक आजारावरदेखील विजय मिळू शकतो. उत्तरप्रदेश राज्यातील मुरादाबाद जिल्हा रुग्णालयाच्या विलगीकरण कक्षात दाखल कोरोना संक्रमित युवतीने हे सिद्ध केले आहे. कोरोनाच्या साथीने जगभरात जेथे लोक घाबरले आहेत तेथे मुरादाबादच्या महिलेने आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर कोरोनाचा पराभव केला आहे.



शनिवारी या महिलेचा दुसरा तपासणी अहवाल निगेटिव्ह आला. तिसर्‍या नमुनाची आज तपासणी केली जाणार आहे. हा अहवाल नकारात्मक येताच मुलीला सोडण्यात येईल. मूंढापांडे येथील १९ वर्षीय तरुणीला १९ मार्च रोजी जिल्हा रुग्णालयाच्या विलगीकरण कक्षात दाखल केले गेले होते. तपासणीनंतर मुलीचा नमुना कोरोना पॉझिटिव्ह आला. ती तरुणी फ्रान्समध्ये शिकत असल्याचे वृत्त आहे. १५ मार्च रोजी ती फ्रान्सहून भारतात परतली होती. १७ मार्च रोजी मुंढापांडे येथे पोहोचताच या तरुणीला ताप आणि खोकल्याच्या तक्रारीनंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मुरादाबादची ही पहिली पॉझिटिव्ह कोरोनाग्रस्त होती.



डॉ. प्रवीण शहा ज्यांनी या तरूणीवर उपचार केले. ते म्हणाले की
, औषधांपेक्षा या तरुणीच्या जगण्याच्या दृढ इच्छेमुळे तिचे आरोग्य सुधारले आहे. ही युवती खूप हुशार आहे. इथे दाखल केल्याच्या तिसर्‍या दिवसापासून तिला खोकला आणि ताप यातून आराम मिळाला. तेव्हापासून पूर्णपणे निरोगी आहे. डॉ. प्रवीण यांनी कौतुकाने सांगितले, ती तरुणी कक्षात एकटी आहे. ती आपला संपूर्ण वेळ इंटरनेट आणि पुस्तके वाचण्यात घालवते आहे. स्वतःला व्यस्त ठेवते. जगभरातील कोरोना साथीच्या रोगासंबंधी घटनांच्या अपडेट ती वेळोवेळी घेत आहे. जेव्हा जेव्हा एखादा डॉक्टर किंवा कर्मचारी तिच्या कक्षात चक्कर मारतात तेव्हा ती नेहमी प्रसन्न आणि आनंदी दिसते. पुढे डॉ. प्रवीण शहा यांनी सांगतात, या तरूणीचे कुटुंबीय भेटायला येतात व तिला दारातून पाहून परत जातात. या संसर्गामुळे रुग्णालयातील पॅनेलच्या सदस्यांव्यतिरिक्त बाहेरील कोणालाही या मुलीशी संपर्क करण्याची परवानगी नाही. कुटुंबातील सदस्यांसह आणि मित्रांशी फोन ती केवळ व्हिडिओ कॉलिंगवर बोलते. डॉक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांशी देखील ती आदराने वागते. तिच्या सकारात्मकता आणि जगण्याच्या प्रचंड इच्छाशक्तीमुळेच तिच्या तब्येतीत सुधारणा झाली. या तरुणीचा तिसरा नमुना अहवाल नकारात्मक येताच या तरुणीला रुग्णालयातून सोडण्यात येईल.

@@AUTHORINFO_V1@@