रा.स्व. संघाचा नाशिक सिव्हिल हॉस्पिटलच्या हाकेला त्वरित प्रतिसाद !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Mar-2020
Total Views |
nashik RSS_1  H




नाशिक
: कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव बघता नाशिकच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गर्दी होण्याच्या शंकेला गृहीत धरून तिथल्या प्रशासनाने रा.स्व.संघाला काही स्वयंसेवक आम्हाला मदतीला मिळतील का ? अशी मागणी केली होती. प्रशासनाच्या याच हाकेला त्वरित प्रतिसाद देत रा. स्व. संघाने ४८ ते ५० स्वयंसेवकांची एक तुकडी तयार केली आहे. ही तुकडी दोन गटात विभागून सकाळी ९ ते दुपारी ३ या वेळात आणि दुपारी ३ ते रात्री ९ या वेळात रुजू झाली आहे.
 


नाशिकच्या सिव्हिल हॉस्पिटलचे अतिरिक्त शल्यचिकित्सक डॉ. निखिल सैंदाणे यांनी संपूर्ण तुकडीला मार्गदर्शन केले. डॉ. बाबुलाल अग्रवाल, रविराज सावंत यांनी देखील नियोजनासाठी पुढाकार घेतला. सर्व स्वयंसेवकांना घरापासून हॉस्पिटलपर्यंत ये जा करण्यासाठी आवश्यक ओळख पत्र, नोज मास्क, गरज पडल्यास हॅण्ड ग्लोव्हज त्वरित देण्यात आले. जबाबदारी स्वीकारलेल्या स्वयंसेवकांनी सुद्धा त्वरित कामे हातात घेतली.
 


यात रा. स्व. संघाच्या स्वयंसेवकांना देण्यात आलेली कामगिरी पुढीलप्रमाणे :


१. रुग्णालयात येणाऱ्या रुग्ण व त्यांच्या कुटुंबीयांना कोरोना बाबत समोपदेशन करणे

२. मास्क मास्क वापरण्यास प्रोत्साहन देणे व सक्ती करणे

३. सोशल डिस्टंसिंगबद्दल आग्रह धरणे व लोकांमध्ये आवश्यक ते अंतर आखून देणे.

४. बऱ्याच समाजसेवी संस्था, रुग्णांच्या नातेवाइकांना बऱ्याच वर्षांपासून भोजनाची सोय करताहेत. त्याठिकाणी सोशल डिस्टंसिंगचे महत्व समजावून देणे

आदी काम सोपविण्यात आले आहे. या कामासाठी समाजातील इतर बऱ्याच संस्था देखील कार्यरत आहेत. यात जाणता राजा स्पोर्ट्स क्लब, एल सी या संस्था पुढाकार घेत सहभागी झाल्या आहेत. या कामात अमोल जोशी, जयेश क्षेमकल्याणी, अभय फडके, मिलिंद साबळे, प्रांजल देव,रोशन येवले , योगेंद्र घरटे, निलेश पवार , सुहास धामणे
आदी कार्यकर्त्यांनी नियोजन करण्यात मदत केली.



@@AUTHORINFO_V1@@