पालिका रुग्णांच्या नातेवाईकांनाही 'शिवभोजन' उपलब्ध करून द्या !

29 Mar 2020 15:40:13
Ashish _1  H x
 

आमदार अॅड. आशिष शेलार यांची मागणी

मुंबई : लॉकडाऊनमुळे सध्या पालिका रुग्णालयाच्या आवारात असलेल्या रुग्णाच्या नातेवाईकांच्या जेवणाची आबाळ होत आहे. त्यांना पाच रुपयांत पालिकेच्या उपहारगृहात शिवभोजन थाळी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी आमदार अॅड. आशिष शेलार यांनी केली आहे.
 
 
मुंबई महापालिकेच्या सर्वच रुग्णालयात कोरोना व्यतिरिक्त अन्य रुग्ण जे उपचार घेत आहेत त्यांच्या सोबत असलेले नातेवाईक अन्य वेळी घरुन येणारा डबा किंवा बाहेर हाँटेलमधील आहार घेतात. रुग्णांसोबत असलेल्या नातेवाईकांना जेवण मिळत नाही. कर्फ्यूमुळे अनेकांना उपाशी झोपावे लागत आहे. पालिकेच्या उपहार गृहातून रुग्णांना जेवण दिले जाते मात्र, रुग्णाच्या नातेवाईकांना हे जेवण उपलब्ध होत नाही. पालिकेच्या सर्व रुग्णालयात असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांची प्रचंड गैरसोय होते आहे. तसेच फसवणूकही होऊ शकते.
 
 
 
त्यामुळे रुग्णासोबतच्या सर्व नातेवाईकांना 'शिवभोजन थाळी' उपलब्ध करून देण्याची मागणी आमदार शेलार यांनी केली आहे. थाळी उपलब्ध करून देण्यात यावी. अथवा माफक दरात रुग्णां सोबत रुग्णांच्या दोन नातेवाईकांना ही रुग्णालयात कॅन्टीनमध्येच आहार उपलब्ध करून देण्यात यावा. सध्यस्थितीत तात्पुरती व्यवस्था म्हणून हा निर्णय तातडीने पालिकेने घ्यावा, अशी विनंती त्यांनी मुंबई महापौर किशोरी पेडणेकर यांच्याकडे केली आहे.
Powered By Sangraha 9.0