जीवनावश्यक वस्तूंचा चोवीस तास पुरवठा

29 Mar 2020 15:23:49

food and supplies_1 
मुंबई : कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लोकडाऊन असून संचारबंदीचे आदेश आहेत. अशा परिस्थितीत राज्यातील जनतेचे हाल होऊ नयेत यासाठी जीवनावश्यक वस्तूंचा चोवीस तास पुरवठा करण्यात येणार आहे, असे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालयाने जाहीर केले.
 
कोरोना आजारासंदर्भात सरकारने जाहीर केलेल्या देशव्यापी लॉकडाऊन दरम्यान नागरीकांना रेशन दुकानावर साहित्य न मिळणे, बाजारात वाढीव दराने वस्तूंची विक्री होणे तसेच जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्याबाबत राज्यभरातून अनेक तक्रारी येत आहेत. या तक्रारींचे अन्न व नागरी पुरवठा मंत्र्यांच्या कार्यालयामार्फत निरसन करण्यात येत आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्याबाबत तसेच इतर कोणत्याही स्वरुपाच्या समस्या भेडसावत असल्यास नागरीकांना सहाय्य मिळवून देण्यासाठी अन्न व नागरी पुरवठा मंत्र्यांचे कार्यालय सदैव तत्पर असून तक्रारदारांनी खालील क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
 
 
संतोषसिंग परदेशी - खासगी सचिव-९८७०३३६५६०,
अनिल सोनवणे-विशेष कार्य अधिकारी -९७६६१५८१११,
महेंद्र पवार- विशेष कार्य अधिकारी-७५८८०५२००३,
महेश पैठणकर- स्वीय सहाय्यक-७८७५२८०९६५
Powered By Sangraha 9.0