हास्यपरी 'स्नेहल'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |


snehal shidam_1 &nbs



'चला हवा येऊ द्या' या झी मराठीवरील कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेली सर्वांची लाडकी हास्यपरी स्नेहल शिदमविषयी...


'कसे आहात मंडळी, हसताय ना, हसायलाच पाहिजे' असं म्हणत चला हवा येऊ द्या हा झी मराठीवरील कार्यक्रम रसिक प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हास्य खुलवतं आहेत. टीव्ही मालिकांमधील तोच तोचपणा पुसून टाकत प्रेक्षकांना मनमुराद हसविण्याचा विडा उचलणारे भाऊ कदम, कुशल बद्रिके, सागर कारंडे, निलेश साबळे, भारत गणेशपुरे यांच्यासारखे मातब्बर कलाकार अविरत प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. याच कार्यक्रमात नावीन्य म्हणून चला हवा येऊ द्याचे 'होऊ दे व्हायरल' हे पर्व सुरु करण्यात आलं. यामधूनच महाराष्ट्रातील तळागाळातील सर्वसामान्य कलाकरांना व्यासपीठ मिळाले. या कलाकारांनी प्रेक्षकांना तर हसवलंच पण त्याचबरोबर समाजप्रबोधनही केलं. त्यापैकी महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली आणि 'होऊ दे व्हायरल' या पर्वाची विजेती कलाकार स्नेहल शिदम हिच्याविषयी...



स्नेहलचे शालेय शिक्षण विलेपार्ले येथील श्री माधवराव
भागवत या शाळेत झालं, त्यानंतर तिने किर्ती कॉलेजमधून मराठी साहित्यात पदवीचे शिक्षण घेतले. तिच्या घरात नाटकांची कोणतीही पार्श्वभूमी नव्हती. मात्र ती साडेतीन वर्षांची असल्यापासून लावणी करायची याचबरोबर चाळीत व शाळेत आयोजित वेगवेगळ्या नृत्य स्पर्धांमध्ये सहभागी होत असे. तिचे काका रंगभूषाकार होते. ते स्नेहलसह इतर भावंडांना नाटकाला घेऊन जात असत तसेच यादरम्यान नाट्यकलाकारांशी भेट देखील घालून देत असे. एवढ्या मोठ्या कलाकारांना अगदी जवळून पाहताना तिला फार अप्रुप वाटायचे. या कलाकारांचे क्षेत्र हे खूपच वेगळे आहे. त्यांना पाहायला गर्दी होताना पाहून स्नेहलला त्याबाबत कौतुक वाटायचे. मात्र आपणही या क्षेत्रात काम करावे असे कधी तिने ठरवले नव्हते. पुढे नववी-दहावीत असताना मात्र तीने फक्त अभ्यासावर लक्ष केंद्रित केले. 



snehal shidam_1 &nbs


यादरम्यान तिच्या शाळेत महाविद्यालयातील काही मुलं बालनाट्य बसवायला यायची. त्यांच्याकडे नाटक शिकवायला प्रसिद्ध अभिनेते येतात
, हे त्यांचं बोलणं ऐकताना फार भारी वाटतं, असे ते स्नेहल सांगते. ते ऐकून आपल्याही असे काही तरी करायला मिळेल, म्हणून स्नेहलने जाणीवपूर्वक किर्ती महाविद्यालयात प्रवेश घेतला. अकरावीत काही तिने केवळ ही सर्व नाट्यकलावंत कशापद्धतीने काम करतात याचे निरीक्षण केलं, मात्र बारावीत असताना स्नेहलनं कॉलेजमधील रंगसंगती नावाचा नाटकांचा संघ जॉईन केला. पहिल्याच वर्षी तिला एकांकिकेत चांगली भूमिका मिळाली. तिची ही पहिलीच भूमिका असतानाही तिच्या कामाचे खूप कौतूक झाले. आपण चांगला अभिनय करू शकतो, असा आत्मविश्वास स्नेहलमध्ये निर्माण झाला. एकांकिकेनंतर तिचे पाऊल प्रायोगिक नाटकांकडे वळले. एसवायबीएला असताना स्नेहलला व्यावसायिक नाटक करायची संधी मिळाली. प्रल्हाद कुरतडकर लिखित आणि ऋषिकेश कोळी दिग्दर्शित 'वीर दौडले सात' हे व्यावसायिक नाटक तिने केले. त्यामुळे नाटकांतून पैसैही मिळतात, हे कळायला लागले. अशा प्रकारे तिने अनेक नाटकांच्या ऑडिशन दिल्या, त्यात कामही केले.

 



याचदरम्यान सोशल मीडियावर झी मराठीवरील 
'चला हवा येऊ द्या'च्या 'होऊ दे व्हायरल' या पर्वासाठी ऑनलाईन व्हिडिओ पाठवण्याचे आवाहन करण्यात आल्याची माहिती मिळाली. मात्र स्नेहलकडे प्रभावी मजकूर नसल्याकारणाने हे राहिले, मात्र काही दिवसांत त्यांची मुंबईत ऑडिशन झाली. ऑडिशन पास होत स्नेहलची टॉप२४ मध्ये निवड झाली. एकएक टप्पा पार करत टॉप ६ मध्ये आली आणि शेवटी होऊ दे व्हायरल पर्वाची ती विजेती ठरली. हे पर्व तिच्या आयुष्याला कलाटणी देणारे ठरले. स्नेहल नाटकांतील भूमिका करतानाही नाट्यरसिकांची आवडती अभिनेत्री होतीच परंतु समाजात तुम्हाला ओळख निर्माण करायची असल्यास व जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचायचे असल्यास तुम्हाला आज टीव्हीसारख्या माध्यमावरच स्वतःला सिद्ध करणे गरजेचे आहे. स्नेहलच्या आई-वडिलांना नाट्यक्षेत्राबाबत बऱ्यापैकी जाणीव होती. त्यांनी तिला कधीही विरोध केला नाही.वीर दौडल सात या नाटकावेळी स्नेहलचा पाय फ्रॅक्चर झाला होता. त्यावेळी तिच्या बाबांनी स्वतः दिग्दर्शकांना फोन करून आश्वस्त केले होते की, तुम्ही काहीही काळजी करू नका. ती प्रयोगाला येईल. यावरून हेच लक्षात येते की स्नेहलला पालकांचा किती पाठिंबा होता.



snehal shidam_1 &nbs


ती सांगते, एक मुलगी म्हणून या क्षेत्रात येताना मला स्वतःला घडविण्यात जितक्या अडचणी आल्या नाहीत तेवढ्या समाजातून आल्या. त्याबाबत विस्ताराने बोलताना स्नेहल म्हणाली की, जेव्हा मी नाटकांच्या तालिम संपवून रात्री-अपरात्री घरी यायचे, त्यावेळी शेजारी म्हणायचे की स्नेहल एवढ्या रात्री अपरात्री बाहेर काय करते. ती नाटकांच्या तालीमीबद्दल शेजाऱ्यांना सांगायची तर ते त्यांना कळत नव्हते. त्यांना कळायचे ते केवळ चित्रपट-मालिकांमधील अभिनयाबाबत. म्हणून स्वतःला सिद्ध करण्यासाठी टीव्ही हेच उत्तम माध्यम असल्याचे ती सांगते. आज जर आपल्याला नट्यरसिक घडवत नाट्यकलावतांची ओळख निर्माण करून द्यायची असेल आणि टेलिव्हिजन इतका मास ऑडियन्स नाटकाकडे वळला पाहिजे. याचबरोबर अस्सल नाट्यरसिकांशिवाय सर्वसामान्य लोकं अडीचशे-तीनशे रुपये खर्चून नाटकाला येत नाही. यावर देखील काही उपाय शोधले पाहिजे. सध्या बदलत चाललेल्या नाट्यक्षेत्राबाबत स्नेहल सांगते की, नाटकांची संहिता जितकी मजबूत असेल तितका तिचा दर्जा उत्तम असतो. त्यामुळे अशा नाटकांना अन्य गोष्टींची काही कमतरता असल्यास फारसा परिणाम होत नाही. ज्यावेळी कथेची गरज असते, तेव्हा आधुनिक तंत्राचा गरजेनुसार वापर करायलाच हवा. त्याशिवाय पाश्चात्य देशांतील नाट्यक्षेत्रात होत असलेल्या घडामोडींचा आपण अभ्यास करायला पाहिजे. त्यातून आपल्या नाटकांच्या विकासासाठी काही घेता आले तर प्रेक्षकांनाही नवीन काहीतरी पाहायला मिळेल.

 



snehal shidam_1 &nbs


सध्या अभिनयाची माध्यमं बदलत चालली आहे. ग्रामीण भागात अनेक होतकरू मुलं वेबसिरिजच्या माध्यमातून लोकांसमोर येत आहे. टिकटॉकवरही अनेक जण आपले अभिनय कौशल्य दाखवत आहे. त्या मुलांना ती एकच सल्ला आहे की, हे एक मृगजळ आहे मग ते टीव्ही असो, रंगभूमी असो की वेबसिरीज तुमच्यात अपयश पचविण्याची ताकद आणि काम करण्याची जिद्द असणे गरजेचे आहे. अशा प्रकारे स्वतःच्या कर्तृत्वावर नाट्यक्षेत्रात आपली ओळख निर्माण करणाऱ्या स्नेहल शिदम हिला पुढील कारकिर्दीसाठी दै. मुंबई तरुण भारतच्या मनापासून शुभेच्छा...!

 

@@AUTHORINFO_V1@@