आता आमदार निधीतून खर्च करता येणार ५० लाख रुपये

28 Mar 2020 16:11:53

mla funds_1  H
मुंबई : दिवसेंदिवस कोरोणाचा आकडा वाढत चालला आहे. अशामध्ये राज्य सरकार योग्य त्या उपाययोजना करत आहे. आता राज्य सरकारने मास्क आणि सॅनिटायझरचा खर्च आमदार निधीतून करण्यासाठी परवानगी दिली आहे. भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी याबाबत माहिती दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्य प्रशासन आणि पोलीस ‘बाहेर पडू नका, घरीच राहा’, असे आवाहन करत आहेत.
 
 
 
सॅनिटायझर, मास्क, औषध फवारणी, मेडिकल सुविधा, गरजेच्या वस्तू खरेदी करण्यासाठी आमदारांना ५० लाख रुपये आमदार निधीतून खर्च करण्यासाठी परवानगी राज्य सरकारने दिली आहे. राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा १५९ वर गेलाय. तर संपूर्ण देशात ८०० हून अधिक कोरोनाग्रस्त आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आला आहे. राज्यात सरकारकडून कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. अशामध्ये सरकारचा हा निर्णय फायदेशीरच ठरणार आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0