कोरोनावर मात करण्यासाठी पंतप्रधानांनी केले आर्थिक मदतीचे आवाहन

28 Mar 2020 18:42:53

modi_1  H x W:



देशवासीयांकडून पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद!


नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात वाढणाऱ्या करोनाशी लढण्यासाठी देशातील जनतेला आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले आहे. भारताने कोविड-१९ शी लढाई सुरू केली असून करोनाविरुद्धच्या या लढाईत देशातील सर्व वर्गातील लोकांनी आर्थिक योगदान देण्याची ईच्छा बोलून दाखवली आहे. यामुळे जनतेतून आलेल्या या आर्थिक मदतीचा उपयोग अडचणींवर मात करण्यासाठी होईल, असे पंतप्रधान मोदी यांनी जनतेला आवाहन करताना म्हटले आहे. पंतप्रधानांनी ट्विटद्वारे हे आवाहन केले आहे.


माझे देशातील जनतेला आवाहन आहे की देशातील जनतेने पीएम-केअर्स फंडात आर्थिक योगदान द्यावे. या फंडाचा उपयोग पुढील काळातील अडचणीच्या काळावर मात करण्यासाठीही करता येणार आहे, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटद्वारे या फंडाबाबत तपशील सांगणारी एक लिंक देखील शेअर केली.



पंतप्रधानांच्या पीएम-केअर्स फंडात छोट्यातले छोटे योगदान देखील स्वीकारण्यात येणार आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले आहे. या जमा झालेल्या आर्थिक ताकदीच्या बळावर देशाच्या आपत्कालिन परिस्थिशी लढण्याच्या क्षमतेत मोठी वाढ होणार असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे. या बरोबरच लोकांच्या संरक्षणाबाबतच्या संशोधनासाठीही याची मोठी मदत मिळणार असल्याचे ते म्हणाले.
Powered By Sangraha 9.0