मोदींचे 'लॉकडाऊन'चे भाषण ठरले रेकॉर्ड ब्रेक

28 Mar 2020 17:11:46


barc_1  H x W:



नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनची घोषणा करणारे भाषण टीव्हीवर सर्वात जास्त पाहिले गेले. या भाषणाची माहिती नुकतीच टीव्ही रेटिंग एजन्सी ब्रॉडकास्टिंग ऑडियन्स रिसर्च काउंसिल्स (बार्क) ने दिली आहे. प्रसार भारतीचे सीईओ शशी शेखर यांनी ट्विट करून याची माहिती दिली. आयपीएलचा फायनल सामना पाहणाऱ्या प्रेक्षकांपेक्षाही जास्त लोकांनी मोदींचे हे भाषण पाहिले आहे. मोदींचे भाषण १९.७ कोटी लोकांनी पाहिले तर आयपीएलचा फायनल सामना १३.३ कोटी लोकांनी पाहिला होता.



बार्कच्या रेटिंगनुसार
, १९ मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण १९१ टीव्ही चॅनेलवर दाखवण्यात आले होते. गेल्या वर्षी ८ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कलम ३७० रद्द करण्यात आल्याचे भाषण केले होते. ते १६३ चॅनेलवर दाखवण्यात आले होते. तसेच ६.५ कोटी लोकांनी हे भाषण ऐकले होते. तर नोटबंदीचे भाषण ८ नोव्हेंबर २०१६ रोजी ११४ चॅनेलवर दाखवण्यात आले होते. हे भाषण ५.७ कोटी लोकांनी पाहिले होते म्हणजेच लॉकडाऊन संबंधीचे भाषण आता पर्यंत सर्वात जास्त पहिले गेलेले भाषण ठरले.

Powered By Sangraha 9.0