इस्लामपुरातील तो परिसर सील ; सांगलीत वाढतोय कोरोनाचा धोका

    दिनांक  28-Mar-2020 17:16:58
|

islampur_1  H x
सांगली : पुणे, मुंबईनंतर सांगली जिल्ह्यामध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. सांगलीतील इस्लामपूरमध्ये एकाच कुटुंबातील १२ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर मंत्री जयंत पाटील यांनी नागरिकांशी फेसबुकवरून संवाद साधत तो परिसर सील करण्याचे आदेश दिले आहेत. लोकांना घरातच थांबण्याचे आवाहन करत असताना संकट मोठे आहे त्याला एकजुटीने आपण परतावून लावू अशी भावनिक साददेखील यावेळी त्यांनी जनतेला घातली आहे.
 
 
 
तसेच, मागील २४ तासांत सांगलीमध्ये तब्बल २३ रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे कोरोनाबाबत उपाय योजनांसाठी, मुंबईमधून तीन डॉक्टरांची समिती सांगलीत दाखल झाली आहे. डॉ. पल्लवी साफळे यांनी मिरजेच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय अधिष्ठाता पदाचा घेतला चार्ज घेतला आहे. कोरोनाचे रुग्ण वाढत चाललेत. इस्लामपुरातील तब्बल २३ जणांना कोरोनाची बाधा झाली. सौदी अरेबियातून प्रवास करुन आलेल्या कुटुंबाशी संबंधित हे रुग्ण असल्याचे सांगण्यात येते आहे. सांगलीतल्या रुग्णांची संख्या आता २३ झाली आहे. याच कुटुंबातशी संबंधित आणखी १२ जणांचे काल रिपोर्ट पॉझिटीव्ह आले. त्यामुळे एकाच कुटुंबातील तब्बल २३ सदस्यांना कोरोना झाल्याने सांगलीतल्या आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे.
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.