आता आंतरराष्ट्रीय विमाने १४ एप्रिलपर्यंत स्थगित

27 Mar 2020 09:59:50

airlines_1  H x
नवी दिल्ली : कोरोना विषाणूचा भारतामध्ये प्रादुर्भाव अद्यापही जाणवत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लॉकडाऊन केल्यानंतर कोरोनाचे रुग्ण सापडण्याची गती जरी मंदावली असली तरी भारतामधून अद्याप हद्दपार झालेला नाही. याच पार्शवभूमीवर आधी केंद्र सरकारने २४ व २५ मार्चच्या मध्यरात्रीपासून सर्व आंतरराष्ट्रीय सेवा स्थगित केल्या. तो निर्णय ३१ मार्चपर्यंत होता. पण आता या सर्व सेवा १४ एप्रिलपर्यंतच स्थगित असतील, असे ‘डीजीसीए’चे उपमहासंचालक सुनील कुमार यांनी सांगितले आहे.
 
 
यादरम्यान सर्व आंतरराष्ट्रीय विमानसेवा व व्हिसासेवा १४ एप्रिलच्या मध्यरात्री १२ पर्यंत स्थगित असतील. यामध्ये फक्त आंतरराष्ट्रीय कार्गोसेवा सुरू असतील, असे ‘डीजीसीए’ने परिपत्रकात स्पष्ट केले आहे. यामुळे परदेशामध्ये अडकलेले नागरिकांची गैरसोय होते का? की सरकार त्यांच्यासाठी आणखी काही उपक्रम आखते हे काही दिवसांमध्ये स्पष्ट केले आहे. तसेच, रेल्वे आणि नागरी उड्डाण सेवा विद्यार्थी, रुग्ण आणि दिव्यांग विभागामध्ये प्रवास करताना दिल्या जाणाऱ्या सवलती स्थगित केल्या जात आहेत.
 
 
याशिवाय या आहेत सरकारच्या काही सुचना
 
 
> मास्क आणि सॅनिटायझर्सचे आगाऊ पैसे वसूल करणाऱ्यांविरुद्ध फार्मा डिपार्टमेंट आणि ग्राहकांशी निगडीत अधिकाऱ्यांनी योग्य ती कारवाई करायला हवी.
 
 
> राज्य सरकारांनी ६५ वर्षांपेक्षा अधिकच्या लोकांना घरातच राहण्याच्या सूचना जारी कराव्या. या सूचना वैद्यकीय कर्मचारी, सरकारी कर्मचारी, वैद्यकीय कामकाजाशी निगडीत कर्मचारी, लोकप्रतिनिधींना लागू होणार नाही.
 
 
> १० वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुला-मुलींना घरातच ठेवावे.
 
 
Powered By Sangraha 9.0